नांदगाव तालुक्यातील जातेगाव देविदास शेळके यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता, हलकी ची परिस्थिती आणि दोन लहान मुले यांची जबाबदारी त्याच्या पत्नीवर असल्यामुळे खचून जाऊ नये म्हणून देविदास च्या वर्ग मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुप तयार करून केली आर्थिक मदत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील तरुण शेतकरी देविदास बाळू शेळके यांस दि.३ रोजी दुपारी शेतात काम करत असतांना यांस कोब्रा या विषारी सर्प चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. येथील नागरिकांनी त्यास तातडीने उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिस्थितीने गरीब असलेल्या आपल्या वर्गमित्राचा अकाली मृत्यू झाल्याने त्याची पत्नी गं.भा हेमलता यांचेवर आपले दोन आकरा व सात वर्षांच्या मुलांचे संगोपन, शेतीची कामे आणि हालाखीची परिस्थिती असल्याने शासनाच्या घरकुल योजनेतील तीसर्या टप्यात बांधकाम सुरू असतानाच सर्पदंशाने मृत्यू झालेल्या दुर्घटनेमुळे अपूर्ण राहिलेले घराचे काम इत्यादी सर्व जबाबदाऱ्या येवून ठाकल्याने खचून जाऊ नये. हा उद्देश नजरेसमोर ठेवून देविदास शेळके च्या अंत्यविधीला जमलेल्या वर्गमित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व वर्गमित्रांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदत करण्याचे ठरविले.
त्यात काही वर्गमित्र बाहेरगावी नोकरी निमित्त असल्यामुळे त्यांनी फोन पे च्या माध्यमातून आणि गावातील सर्व मित्रांनी रोख स्वरूपात रक्कम जमा केली. आणि बघता बघता आठ दिवसांत एक लाख दहा हजार रुपये जमले, ही जमा झालेली रक्कम शुक्रवार दि. १२ रोजी देविदास चार दशक्रिया विधी आटोपल्या नंतर गोरख शेठ गायकवाड, अरुण गायकवाड, सोमनाथ पवार, मारुती चव्हाण, योगेश सोनवणे, बाबा काळे, सागर यादव, रोहिदास जोनवाल आणि संजय जगताप यांनी गं भा हेमलता शेळके यांच्या सुपूर्द केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, किशोर आहेर व त्यांचे नातेवाईक व गावातील नागरिक उपस्थित होते. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रपरिवाराने शेळके परिवारास संकटाच्या वेळी धावून येऊन आर्थिक मदत केल्यामुळे सर्वांची तोंड भरून कौतुक केले.
0 Comments