कासारी येथे वन विभागाच्या हाद्दीत तरुणाची आत्महत्या

 Bay- team aavaj marathi 

Dr. हिरे पत्रकार कासारी नांदगाव 

दि.३०....

नांदगाव तालुक्यातील कासारी - ढेकू रस्त्यालगत वनविभागाच्या हद्दीत चांदेश्वरी पाझर तलावजवळ पवन कारभारी निंबारे वय २५ वर्ष, रा. चंदनपुरी जातेगाव या तरुणाने दि. २९ रोजी सायंकाळी उशीरा झाडाला दोरखंड बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.

याबाबत त्याचा लहान भाऊ श्रावण वय २१ रा जतपूरा ता नांदगाव याने पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार दोघे भाऊ नांदगाव येथील रेल्वे धक्क्यावर मजुरीचे काम करत होते. मयत पवन कारभारी निंबारे हा आपल्या आई सोबत चंदनपुरी येथे राहत होता. फावल्या वेळेत आई व भाऊ पवन हे शेती आणि मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. पवन याने दि. २९ रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नांदगाव येथील रेल्वे धक्क्यावर मालगाडी तील सिमेंट गोण्या उतरण्याचे मजुरीचे काम केले. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास चंदनपुरी येथे घरी जात असल्याचे सांगून तेथून निघून गेला, त्यास दारू पिण्याचे वेसन होते.

पवन याने दि. २९ रोजी सायंकाळी चंदनपुरी येथे घरी न जाता कासारी जवळील चांदेश्वरी पाझर तलावाजवळ वन विभागाच्या हाद्दीतील झाडाच्या फांदीवर दोरखंड बांधून गळफास घेतला असल्याचे बहिन शकिला वामन डोळे रा.जतपूरा हिने फोन करून सांगितले असल्याचे श्रावण निंबारे याने दि ३० मार्च रोजी सकाळी दिलेल्या माहिती नुसार नांदगाव पोलीस ठाण्यात नागरी संहिता कलम १९४ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १९/१२०२६ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते हे तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments