जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल नांदगाव येथे 20 जुलै रोजी गुरुपौर्णिमा अगदी जल्लोषात साजरी करण्यात आली. समाजामध्ये असलेले गुरुचे महत्व लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी स्कूलचे प्राचार्य श्री मनी चावला सर,मुख्याध्यापक शरद पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. गुरूंमुळे आपल्याला जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यासाठी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण केले तसेच आभार स्वरूप भेटवस्तू दिल्या. त्यांच्यासाठी भाषणे, कविता, समूह नृत्य आणि गाणी प्रस्तुत केली. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते केक कटिंग करण्यात आला.सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सुवर्णा आव्हाड यांनी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन आखले होते.
कार्यक्रमाचा समारोप करताना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या विद्यार्थिनी रसिका मेडतिया व मयुरी चव्हाण यांनी केले. संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा,सहसचिव सौ.प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त जुगल- किशोरजी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल, रिखबचंद कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, प्रशासन अधिकारी प्रकाश गुप्ता यांनी स्कूलचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
0 Comments