होरायझन अकॅडमी, नांदगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत गुरुपौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्राचार्या श्रीमती. पुनम डी.मढे यांच्या हस्ते करण्यात आले

याप्रसंगी अकॅडमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गुरूच्या प्रति आदर दाखवत शिक्षकांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. तसेच शिक्षकांना भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. गुरुपौर्णिमा उत्सव हा व्यासमुनी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. 

याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती असणारे प्रेम आदर हे आपल्या भाषणातून सादर केले यावेळी श्री. पिंगळे यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले, तर शरयू आहेर यांनी प्रश्णमंजुषा घेतली. तसेच इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांना नृत्य मार्गदर्शन शालेय शिक्षिका अंजली मोरे यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या श्रीमती. पुनम डी.मढे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले श्रीमती.अनुराधा खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले. मविप्र समाज संस्था नांदगाव संचालक इंजि. अमित उमेदसिंग बोरसे-पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्या दिल्या.

Post a Comment

0 Comments