मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील मांडवड परिसरात मक्यावर लष्करी अळीने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तवले असून, मका वाचवण्यासाठी महागडी औषधांची फवारणी करताना शेतकरी राजा दिसून येत आहे.लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

मागील वर्षाच्या दुष्काळाने बळीराजा हतबल झाला होता, आपले पशुधन वाचवण्यासाठी इतर तालुक्यातून चारा उपलब्ध करण्यात हजारो रुपये खर्च केले होते यावर्षी या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे मोठ्या प्रमाणात मक्याची पेरणी केली. परंतु मका पिकावर यंदा लष्कर अळीचे आक्रमण झाले हे बघून शेतकरी राजा चिंताक्रांत झालेला आहे. गतवर्षी अत्यल्प पावसामुळे रब्बी व खरीप हंगामला मोठा फटका बसला होता. दुष्काळाच्या दाहकतेने होरपळून निघालेल्या शेतकरी बांधवांनी यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणामध्ये मका पिकाची लागवड करून मागील वर्षाची उणीव भरून निघावी यासाठी मेहनत घेतली होती.

 परंतु मका पीक जसे-जसे मोठे होत आहे त्यावर लष्करळीच्या आक्रमण झाल्याने शेतकरी चांगले हतबल झालाय. दुष्काळ,अवकाळी,बाजार भाव या सर्वांनी ग्रासलेल्या शेतकऱ्याला आता या लष्कर अळीने परेशान केले. या वर्षी मृग नक्षत्रापासून पिकास योग्य असा पाऊस अधून मधून होत आहे, त्यात हजारो रुपयाचे रासायनिक खत घेऊन पीकास खत देण्याचे काम शेतकऱ्यांतर्फे सध्या सुरू आहे. त्यातच पोग्यामध्ये लष्कर अळीचे अंडे दिसून आले असून लष्करी अळीचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येत असल्याने शेतकऱ्यांतर्फे महागडी औषधी फवारणी करण्यात येत आहे.

अगोदरच दुष्काळ त्यातच लष्कर अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याचा फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.दिवसेंदिवस शेती कामासाठी मजूर वर्ग मिळणं कठीण झाले आहे, त्यामुळे यावर्षी मांडवड परिसरामध्ये कपाशीचे क्षेत्र कमी करून मका पिकाला पसंती दिली होती. मात्र मकावर आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्गास  मोठे नुकसान सहन करावे लागले असे चित्र दिसत आहे.





 

Post a Comment

0 Comments