शिकार्याचीच झाली शिकार विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू

 Bay- team aavaj marathi 

एकनाथ भालेराव पत्रकार येवला (नाशिक) 

बसवंत पिंपळगावच्या कादवा नदीलगत दोन महिन्यांपासून प्राण्यांवर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २१ सकाळी उघडकीस आली. वीज रोहित्रावर बसलेल्या मोराची शिकार करण्या -साठी बिबट्या गेल्याने त्याचा उच्चदाबाच्या वीज तारेला स्पर्श झाल्याने क्षणार्धात बिबट्यासह मोराचाही मृत्यू झाला. या बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला होता.
 

छायाचित्रात रोहित्रास चिटकलेला मोर व खाली मृत्यूमुखी व खाली मृत्यूमुखी पडलेल्या बिबट्या दिसत आहे 

सविस्तर वृत्त असे की, कादवा नदी तीरालगत आ. दिलीप बनकर यांच्या शेतालगत बिबट्याने दोन महिन्यांपासून ठाण मांडले होते. लपण्यासाठी उसाचे क्षेत्र व पाणी पिण्यासाठी कादवा नदी असल्याने बिबट्याने तळच ठोकला होता. भक्ष्य टिपण्यासाठी रात्रीच्या वेळेला तो बाहेर पडत असे. त्याने गायी, वासरे, कुत्री इत्यादी पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. त्याची ह्या परिस्थितीत अक्षरशः दहशत पसरली होती. नागरिकांनी वन विभागा- कडे पिंजरा लावण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, बिबट्याचा शिकार करताना दुर्दैवी मृत्यू झाला.

ही घटना पानसरे वस्तीलगत गट नंबर ४९९ मधील उच्च दाबाच्या वीज रोहित्राजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास घडली बिबट्या शिकारीसाठी परिसरात मुक्तसंचार करीत होता.  बिबट्याच्या दृष्टीस मोर दिसला. बिबट्या मारणार या भीतीने मोर रोहित्राच्या वीज प्रवाहाच्या धोकादायक ठिकाणी बसला. त्याचवेळी बिबट्याने मोरावर झडप मारण्यासाठी उडी घेतली. परंतु त्याच्या शेपटीचा स्पर्श रोहित्राच्या वीज प्रवाहाच्या ठिकाणी झाला. विजेचा जोरदार धक्का लागल्याने बिबड्याच्या शरीरात वीज प्रवाह आल्याने तो तडफडू लागला. काही वेळात त्याचा मृत्यू झाला. या नर जातीच्या बिबट्याचे वय नऊ वर्ष असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती वन विभागास समजताच वन विभागाचे अधिकारी नाना देवरे, विजय टेकणार, अजय शिंदे यांनी पंचनामा करून मयत बिबट्या व मोराच्या मृतदेहावर शिरवाडे वणी येथे अत्यसंस्कार केले.

Post a Comment

0 Comments