श्री पिनाकेश्वर महादेवचे विस हजार पेक्षा अधिक भाविकांनी घेतले दर्शन

 Bay- team aavaj marathi

 दि.५...श्रावण महिन्याचे औचित्य साधत सुमारे विस हजार भाविकांनी श्री पिनाकेश्वर महादेव घेऊन वन पर्यटनाचा आनंद घेतला. सुमारे ७१ वर्षानंतर पहिल्यांदा आलेल्या दुर्लभ योगाने श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झाल्याने रविवारी रात्री १२ वाजेनंतर सुषुर्भूत होऊन भाविकांनी देवास अभिषेक केला. 

त्यानंतर भल्या पहाटे पासून जातेगाव आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्री पिनाकेश्वर महादेवचे दर्शन घेतले. हे देवस्थान नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे महादेवाचे देवस्थान आहे. येथे येवला वैजापूर तालुक्यातील भाविकांच्या दिंड्या आल्या होत्या.हर हर महादेव,बम बम बोले, श्री पिनाकेश्वर भगवान की जय च्या गजराने भाविकांनी परिसर दणाणून सोडला होता.

 त्यापाठोपाठ मिळेल त्या चारचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा दुचाकी वगैरे वाहनाने येवून देवाचे दर्शन तसेच वन भोजनाचा आस्वाद घेत पर्यटनाचा आनंद घेतला. भल्या पहाटे पासून सायंकाळी उशिरापर्यंत विस हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा दावा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

यावेळी देवस्थान ट्रस्ट आणि मालेगाव ब्लड सेंटर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजे पर्यंत चाळीस रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असुन ही दरवर्षी पेक्षा जास्त भाविक आल्याने प्रसाद व कटलरी सामान, बेंटेक्स ज्वेलरी विक्रेत्यांचे बर्या पैकी व्यवसाय झाला.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचे करण्यात आले स्वागत

 दरवर्षी हजारो भाविक देवाच्या पिंडीवर श्रध्देने नारळ अर्पण करतात. ते तेथून उचलून बाहेर काढून वितरण करण्यात देवस्थान ट्रस्टला मनुष्यबळ उपलब्ध करावे लागत होते. परंतु यावर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या यात्रोत्सवाचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त मंडळ व सभासदांच्या झालेल्या बैठकीत अर्पण केलेले नारळासाठी मनुष्यबळ न अडकता सोमवार दि.५ पासून श्रावण महिन्याच्या शेवटपर्यंतच्या नारळाचा ठेका येथील वाल्मिक रमेश उगले यांना एक लाख ३५ हजार रुपयात लिलाव पद्धतीने देण्यात आला.यावेळी सात इतर व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेतला होता. ट्रस्टच्या या निर्णयाचे सर्व सभासद आणि ग्रामस्थांनी स्वागत केले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, शिवाजी वर्पे त्याचप्रमाणे पंढरीनाथ पवार, नाना पवार,अंकुश वर्पे दशरथ पवार अरुण हिंगमिरे हे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सचितानंद भट, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.दिवसभर पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे हवालदार भास्कर बस्ते आणि महिला व पुरुष पोलिस कर्मचारी होमगार्ड पथकातील कर्मचारी यांनी योग्य बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

.

  

Post a Comment

0 Comments