तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सर्जेरावदादा माध्यमिक विद्यालय जामदरीचे घवघवीत यश

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

जामदरी येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत येथील सर्जेराव दादा माध्यमिक विद्यालयाच्या 14 वर्षे,17वर्षे,19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने घवघवीत यश प्राप्त केले. 19 वर्षे वयोगटातील मुलींनी मनमाड ज्युनिअर कॉलेज आणि वेहेळगाव ज्युनिअर कॉलेजच्या बलाढ्य संघांना हरवून  विजेतेपद प्राप्त केले.

14 वर्षाच्या आतील मुलींनी अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय वखारीचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 19वर्षे वयोगट -प्रज्ञा इनामदार,संगीता खेमनर,पुनम पवार, प्रिया म्हस्के,उन्नती शिरसाट,गायत्री सोनवणे,जयश्री तांबे, सुनिता तांबे, जागृती शहापूरकर योगिता जाधव रूपाली धुळे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.  

विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंना सरचिटणीस दिलीप इनामदार,अध्यक्ष विराज इनामदार, मुख्याध्यापक अशोक कदम, सरपंच बाबासाहेब मोरे, भगवान यांनी अभिनंदन करुन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments