चिंचविहीरच्या सुनिताची पोलीस पदाला गवासनी

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव {नाशिक}

अनेक क्षेञात मुली आपले नाव उज्वल करताना दिसत आहेत.अशीच नांदगाव तालुक्यातील साधारण तेराशे लोकवस्ती असलेल्या चिंचविहीर या गावातील सौ. सुनिता सोमेश्वर घाडगे/दानेकर या विवाहीतेने जिद्दीने व मेहनतीने महाराष्ट्र पोलीस पदावर भरती होण्याचा बहुमान मिळविला हि चिंचविहीर या गावाची पहिली महिला पोलीस ठरली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चिंचविहीर येथील माहेर व सासर असलेली सौ. सुनिता सोमेश्वर घाडगे/दानेकर या विवाहीतेने जिद्दीने व मेहनतीने महाराष्ट्र पोलीस पदावर भरती होण्याचा बहुमान मिळविला ती चिंचविहीर या गावाची पहिली महिला पोलीस भरती झाल्याने तिची चिंचविहीर येथील नागरीकांनी गावात जंगी मिरवनुक काढून स्वागत करुन जाहीर नागरी सत्कार केला.

 सुनीताने घाडगे व दानेकर या दोन कुटुंबांचे नाव लौकिक केले आहे, "मुला पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी" या म्हण खरी ठरली आहे.सासर व माहेर चिंचविहीर येथील असलेली सुनीता भानुदास कारभारी दानेकर यांची ती मुलगी आणी घोंडीराम पुंडलिक घाडगे यांची सुन आहे. तीचा पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने दोन्ही परिवाराचा आनंद द्विगुणित झाला.

दोन्ही घरची आर्थीक परिस्थित अत्यंत हलाखची असताना सासरच्या मंडळीने तीची आवड व जिद्द लक्षात घेऊन तिला छत्रपती संभाजी नगर येथे अकॅडमीत प्रशिक्षण देऊन पोलीस भरतीसाठी उभे केले असता सुनीताने संधीचे सोने करत प्रचंड मेहनत घेऊन सासरच्या मंडळींचा विस्वास सार्थ ठरवत यशस्वी झाली.या गावातील स्ञी पुरुषा मध्ये पोलीस खात्यात भरती होणारी पहिली व्यक्ती आहे. तीचा पती देखिल स्पर्धा परीक्षा तयारी करतो आहे. दरम्यान चिंचविहीरची कन्या प्रथम पोलीस झाली या आनंदात नागरीकानी जंगी मिरवणुक काढून जाहीर नागरी सत्कार केला. यावेळी तीचे शिक्षक कांदळकर यांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments