कासलीवाल विद्यालयात आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांच्या हस्ते उदघाटन

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात दि..६ ऑगस्ट माजी नगराध्यक्ष स्व.माणिकचंद कासलीवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध रोईंगपटू (नौकनयन) व अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी दत्तू भोकनळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलकुमार कासलीवाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना .भोकनळ यांनी आपले खेळाशी संबंधित विविध अनुभव कथन केले.त्यागातून खेळाडू निर्माण होतो. शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे. खेळातून आरोग्य,पैसा,व नोकरीदेखील मिळू शकते म्हणून खेळाकडे करिअर च्या दृष्टिकोनातून ही पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन भोकनळ यांनी केले.तसेच शिक्षणासोबत खेळ व खेळासोबत शिक्षणाची सांगड घालावी असे आवर्जून सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन.सुनीलकुमार कासलीवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे.खेळ खेळताना शिस्त पाळावी तसेच खिलाडूवृत्तीने खेळावे असे आवाहन करताना सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री भोकनळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेमध्ये नांदगाव तालुक्यातील जवळपास 40 संघ सहभागी झाले होते.

 या कबड्डी स्पर्धा यशस्वी व्हाव्या म्हणून क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन,अशोक बागुल,यांनी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष - सुनीलकुमार कासलीवाल, संस्थेचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल , सचिव -विजय चोपडा, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल,प्रिन्सिपल मनी चावला मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार,विशाल सावंत, गोरख डफाळ, प्रिन्सिपल मनी चावला तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता गायकवाड व निलोफर पठाण यांनी तर शरद पवार यांनी आभार व्यक्त केले.

.

Post a Comment

0 Comments