Bay -team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार (नांदगाव)
दि ३ सप्टेंबर विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील बस कामगारांनी राज्यात बेमुदत कांमबंद आंदोलन पुकाले या आंदोलनात नांदगांव बस आगारातील चालक वाहक इत्यादी
कर्मचारी हे १००% कामबंद आंदोलनात सहभागी झाले असल्याने शेतकरी बांधवांचा वर्षाचा महत्वाचा पोळ्याच्या व रक्षाबंधनाच्या सणासाठी माहेरी लाडक्या बहिणींना व ज्येष्ठ नागरीकांना सणासाठी गावी आलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे.
काम बंद आंदोलनात सहभागी झालेले परिवहन विभागाचे कर्मचारी
काम बंद आंदोलनात सहभागी झालेले परिवहन विभागाचे कर्मचारी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारने परिवहन महामंडळाच्या चालक वाहक इत्यादी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी विविध मागण्यांसाठी सहा महिने कामबंद आंदोलन केले होते, त्यावेळी कर्मचार्यांच्या वेतनात काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. परंतु शासनाने लेखी आश्वासन दिली ती पाळली नाही. त्यामुळे राज्यातील परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे विविध संघटनांनी दिनांक 3 सप्टेंबर पासून पुन्हा काम बंद आंदोलन छेडले असून एकुन १३ प्रमुख मागण्यांसाठी परिवहन कामगारांनी केल्या असून, येथील कर्मचाऱ्यांनी घोषना देत आपला संप चालू ठेवला आहे. त्यामध्ये नांदगांव परिवहन आगारातील ३०० कामगार सामील झाले असल्याचे समजते. 
बसस्थानकात असलेला शुकशुकाट

0 Comments