बाजार समितीकडून शेतकर्यांची लुट होत असलेल्या आरोपात तथ्य नाही - सभापती बोरसे

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव बाजार समिती मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लुट होत असल्याचे न्यायडोंगरी येथील शेतकरी जगन्नाथ प्रतापराव पाटील यांनी दि.१६ ऑगस्त रोजी बाजार समितीच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, वरील शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दि.१६ऑगस्त रोजी आपला शेतीमाल (कांदा) विक्री करण्यासाठी आणला होता. तो कांदा व्यापारी भिवराज भगीरथ फोफलिया (राहुल ट्रेडर्स )यांनी १६११ रुपये प्रती क्विंटल या दराने विकत घेतला.

त्याचे वजन ६.८० (सहा क्विंटल ऐंशी किलो )आले होते. त्या वजना प्रमाणे १०९५५ रुपये इतकी रक्कम झाली. त्यानंतर काटा पट्टी नंबर १०६८४६३ मध्ये मात्र एकूण खर्च ८२.९६ वजा करून मला १०८७२ रूपये रोख देण्यात आले आहेत सदरचा खर्च कशाचा कापुन घेण्यात आला या बाबत कोणताही खुलासा या काटा पट्टी वर करण्यात आलेला नाही ?तर हिशोब पट्टीवर मात्र खर्च हे सदर निरंक दाखविण्यात आलेले आहे व तश्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा शिक्का असलेल्या दोन पावत्या पाटील यांना देण्यात आलेल्या आहेत.एकाच मालाची विक्री झालेल्या एकाच वजनाच्या एकाच भावाच्या दोन पावत्या असून दोघा पावत्या वरील रकमेमध्ये मात्र तफावत शेतकरी जगन्नाथ पाटील यांना आढळून आल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बाजार समिती केलेल्या आरोपात तथ्य नाही - सभापती बोरसे

याबाबत बाजार समितीचे सभापती सतीश बोरसे यांनी आवाज मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी विक्री केलेल्या शेतमालाच्या त्यांना दोन पावत्या मिळाल्या आहेत त्यात एका पावतीवर मालाचे वजन त्याचा ठरलेला भाव आणि त्याची झालेली रक्कम ही आहे. व दुसऱ्या पावतीवर हमाली, वाराई वजा जाता निव्वळ रक्कम अशी आहे. त्यात शेतकरी बांधवांना खुलेआम नाडले जात असल्याचा जगन्नाथ पाटील यांनी केलेला आरोप चुकीचा आहे.

हमाली, वाराई शेतकर्यां कडुनच असते, हमाल मापारी कामगारांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यात लेव्ही आहे हमाल मापारी आमचे कर्मचारी नाही. लेव्ही व्यापार्यांनी द्यावी ते कोर्टात गेले. लेव्हिची रक्कम व्यापारी द्यायला तयार नाही. याच प्रश्नावर मागे दोन महिने संप झाला. त्यावर नंतर तोडगा काढून, हमाल मापारी यांचा प्रश्न मार्गी लावला गेला आहे. व्यापारी बांधवांनी केलेल्या संपानंतर शेतकरी बांधवांना रोख स्वरूपात शेतमालाची रक्कम बाजार समितीच्या कार्यालयात मिळायला लागली आहे. त्यामुळे बाजार समितीवर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सभापती बोरसे यांनी याप्रसंगी सांगितले.



Post a Comment

0 Comments