रयत शिक्षण संस्थेच्या श्री.छ.शिवाजी माध्य.व उच्च माध्य. विद्यालय वनसगाव ता.निफाड (नाशिक) विद्यालयातील उच्च माध्यमिक विद्यालयाचे हिंदी विषय अध्यापन करणारे प्रा.श्री. विजय पांगुळ गेल्या 8 वर्षापासून अध्यापनातील नवनवीन बदल लक्षात घेता ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्या- बद्दल त्यांना सन 24/25 चा 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 15 सप्टेंबरच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
कर्मविर भाऊराव पाटील माध्य.व उच्च माध्य.विद्यालय पेडकाई माता माध्य.विद्यालय, केंद्रीय प्राथमिक शाळा, व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, ग्रा.पं. साकोरे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, यांच्यासह आम्ही साकोरीकर, साकोरा शिक्षक मंच, तसेच मित्र परिवार, आप्तेष्टांनी विजय पांगुळ यांचे अभिनंदन केले.
0 Comments