कार्यकर्त्यांनी केलेला नवस पुर्तीसाठी खा.संदिपान भुमरे श्री पिनाकेश्वर चरणी लीन

 Bay- team aavaj marathi 

दि.१... नुकत्याच झालेल्या लोकसभा २०२४ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी पालकमंत्री श्री संदिपानजी भूमरे हे लोकसभा निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून यावे यासाठी कन्नड तालुक्यातील औरळा व जेऊर भागातील शिवसैनिकांनी केलेल्या नवस पुर्ती करण्यासाठी शनिवार दि.३१ रोजी खा.संदिपान भुमरे श्री पिनाकेश्वर चरणी लीन झाले.

नवस पुर्ण करताना खा संंदिपान भुमरे व कार्यकर्ते आणि पुरोहित दत्तात्रय भट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यासह जळगाव,धुळे, अ.नगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या जातेगाव येथील श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव येथे लोकसभा निवडणुकीपूर्वी येवून श्री संदिपानजी भूमरे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले तर, देवास महाभिषेक व एक दिवस येथे येणाऱ्या भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था (भंडार्याचे आयोजन) करण्यात येईल असा नवस केला होता.त्यानुसार खा.भुमरे यांच्यावर प्रेम करणार्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून शनिवार दि. ३१ रोजी खा.भुमरे यांच्या व्यस्त वेळेत वेळ मागून घेतली. व केलेल्या नवसाची पुर्तता करण्यासाठी खा भुमरे यांच्या हस्ते देवाला महाभिषेक करून भंडार्याचे आयोजन केले.

यावेळी शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख भरतभाऊ राजपूत,तालुकाप्रमुख केतनभैया काजे, उपजिल्हाप्रमुख मनोज राठोड, उप तालुकाप्रमुख काकाभाऊ काळे, विभागप्रमुख सोमनाथ जाधव, उपविभाग प्रमुख प्रवीण धातबळे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सोनालीताई धाटबळे, महिला आघाडी उप तालुकाप्रमुख.सौ.कोमल अक्षय झिमन पाटिल किसानसेनेचे तालुकाप्रमुख गणेश गिधे, निपाणीचे माजी सरपंच व शिवसेना नेते प्रताप सुर्यवंशी सरपंच, वाल्मीक खैरनार, आकाश झिमंन, आनंद चव्हान, रावसाहेब वरपे काका, राजु भरतीया यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
याप्रसंगी देवस्थानच्या वतीने सचिव रामदास पाटील यांनी खासदार भुमरे यांचा शॉल व श्रीफळ सन्मान केला. याप्रसंगी बोलताना खासदार मुंबई म्हणाले की मला धार्मिक कार्यात जाण्याची पहिल्यापासून आवड आहे. परंतु आज माझ्या कार्यकर्त्यांनी मी लोकसभेत निवडून यावे, यासाठी देवाला नवस केला होता. हे मला आज कळाले आहे, मला येथे येऊन खूप प्रसन्न वाटले असून, माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी लोकसभा निवडणुकीत विजयी व्हावे म्हणून देवास नवस करून भंडाऱ्याचे आयोजन हे समजल्यामुळे माझे मन गहिवरून आले असे म्हणाले.

Post a Comment

0 Comments