नांदगाव तालुक्यात तीसर्या उपबाजार समितीस मंजुरी

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव तालुक्यातील वेहेळगाव परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस गावातील शेतकरी बांधवांच्या मागणी नुसार तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहास कांदे यांचे प्रयत्नाने नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीसर्या उपबाजार आवारास वेहेळगांव येथे शेतमाल खरेदी केंद्र सुरू करणेस परवानगी मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे यांनी दिली.

 यावेळी बोलताना सभापती बोरसे म्हणाले की, वेहेळगांव येथे बाजार समितीने शेतमाल लिलाव केंद्र सुरू करावा अशी मागणी वेहेळगांव सह परिसरातील गावाचे शेतकरी वर्गाकडून होती. परंतु त्यासाठी जागेची गरज होती. येथील ग्रामपंचायतचे पदाधिकार्यांनी पुढाकार घेऊन गावठाण मालिकीची ५ हेक्टर जागा बाजार समितीस कराराने उपलब्ध करून दिली असून यासाठी सरपंच सौ.वर्षा प्रमोद भाबड, उपसरपंच,सर्व सदस्य तसेच मजूर फेडरशन -चे संचालक बाजार समितीचे माजी उप सभापती प्रमोद भाबड, तसेच येथील बाजार समितीचे संचालक पोपट सानप व ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याने शेतमाल खरेदी केंद्रास आ.सुहास आण्णा कांदे यांचे सहकार्याने जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी मंजूरी दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली अशी माहिती त्यांनी दिली. 

परिसरातील या गावातील शेतकरी बांधवांना होणार लाभ 

मंजुरी मिळालेल्या उपबाजार शेतमाल खरेदी केंद्रामुळे 
वेहेळगांवसह परिसरातील कळमदरी,जामधरी, पळाशी, सावरगांव, मंगळणे, आमोदे,बोराळे, मळगांव, न्यू पांझण, मुळडोंगरी, बिरोळा, रणखेडा,चांदोरा,तळवाडे आदि गावांसह चाळीसगांव तालुक्यातील पिलखोड, सायगांव, उंबरदे,नरडाणे इत्यादी गावांतील शेतकरी बांधवांना मका, कांदा शेतमाल विक्रीसाठी पर्याय उपलब्ध होणार आहे. या खरेदी केंद्राच्या मंजूरी प्रस्तावास ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,रामुकाका बोरसे,विलासभाऊ आहेर, राजेश (बबीकाका) कवडे, तेजदादा कवडे, विष्णू निकम सर या नेत्यांसह बाजार समितीचे उपसभापती दिपक मोरे, सचिव अमोल खैरनार बाजार समितीचे संचालक मंडळाचे सहकार्य मिळाले. काही दिवसात या भागातील व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदीचे परवाने नांदगाव बाजार समिती मार्फत देण्यात येतील, त्यानंतर सर्व संचालक मंडळ व मान्यवरांचे उपस्थितीत आ. सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते करण्यात येणार आहे.परिसरातील शेतकरी बांधवांची बर्याच दिवसांची उप बाजार समितीची मागणी माझे कार्यकाळात पुर्ण होत असल्याने मनस्वी समाधान होत असल्याचे बोरसे यांनी याप्रसंगी सांगितले.



Post a Comment

0 Comments