गणेश उत्सव काळात नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मुदतीत गणेश विसर्जन करा अन्यथा कायदेशीर कारवाई होईल असे आवाहन पो नि प्रितम चौधरी यांनी केले ते नांदगांव शांतता समिती बैठकीत बोलत होते. यावेळी गणेश मंडळांना नियमांचे पालन करण्याच्या सक्त सूचना पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी दिल्या जे मंडळे नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु अशा सुचान देण्यात आल्या .यावेळी पो नि चौधरी यांनी गणेश मंडळांना दिलेल्या सुचना या प्रमाणे गणेश मंडळांना डी जे वाद्ये वापरण्यास सक्त मनाई आहे.
गणेश उत्सवाच्या ११ दिवसाच्या आतच गणेश विसर्जन करा, राञी १० वाजे च्या आत विसर्जन मिरवनुक संपवा,सकाळी ६ ते राञी १० पर्यंत स्पिकर कमी आवाजात लावा तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा सक्त सुचना नांदगांव येथे झालेल्या शांतता समिती बैठकित पो नि प्रितम चौधरी यांनी दिल्या यावेळी ॲड सचिन साळवे,माजी नगरसेवक विश्वासराव कवडे, संगिता सोनवने, रेखा शेलार यांनी देखील मंडळाना मार्गदर्शन केले.यावेळी विविध मंडळाचे पदाधिकारी, पञकार, पोलीस उपस्थित होते. गणेश मंडळांनी उत्सव काळात गणेश स्थापन केलेल्या मंडपात सीसीटीव्ही बसवा ती एक सुरक्षा आहे.
डिजे वाद्ये लावल्यास गुन्हे दाखल होतील डिजेचा अट्टाहास करु नका, संबळ, मंगल व सन ई वाद्ये लावा जेने करुन सामण्यांना त्याचा ञास होणार नाही हायवेवरील मंडळानी विशेष काळजी घ्या. विजपुरवठा सुरळीत असावा, अधिकृत विजपुरवठा घ्या मंडळाजवळ पुरेसे पाणी व वाळूने भरलेल्या बकेट ठेवा वेळप्रसंगी कामात येथील. या दरम्यान मद्यप्राशान करणारावर कारवाई होईल मंडळाची सुरक्षा मडळाने घ्यावी वादग्रस्त पोस्टर लाऊ नहे वादग्रस्त घोषना करु नये, सोशल मिडीयाचा गैरवापर करु नये. पोलीसांनी व्हिडिओ शुटींगची स्वतंञ व्यवस्था केली. याची खबरदारी घ्यावी मंडळानी स्व:ताची राखनदारी करावी.
गणेश मंडळानी आचारसहिता पाळावी आदी सह महत्वाच्या सुचना यावेळी देण्यात आल्या तसेच शहरात वावरणारी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नजी मोकाट जनावरे शहरात वावरता ति जनावरे ज्याची आहे त्यांनी ती घेऊन जाव्यात अन्यथा मोकाट जनावरे गोशाळेला देण्यात येथील असे आवाहन न पा मुख्यधिकारी नांदगांव. यांनी केले.यावेळी विश्वासराव कवडे, शिव कन्या संगिता सोनवने, रेखा शेलार, ॲड. सचिन साळवे, पाटील, राजेंद्र गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.
0 Comments