श्री सिद्ध बाबा धर्मनाथ जी महाराज सेवाभावी संस्था संचलित. एम.डी. काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, तांदुळवाडी येथे दि.५ रोजी गुरुवारी शाळेचे संस्थापक श्री दिनेश काळे, प्रिन्सिपल नेहा काळे, व्हॉईस प्रिन्सिपल साक्षी आहिरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जीवन चरित्राची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
गुरुविण न मिळे ज्ञान |ज्ञानाविण न होई जगी सन्मान||
जीवन भावसागर तराया|चला वंदू गुरुराया||
यामध्ये सहभागी झालेले १ ली ते ६ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अतिशय छान प्रकारे पार पाडली त्यामध्ये चेअरमन सर म्हणून श्रेयस काळे, प्रिन्सिपल समृद्धी काळे, व्हॉइस प्रिन्सिपल वैष्णवी आहेर या विद्यार्थ्यांनी भूमिका पार पाडली .डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी सादर करण्यात आली. सूत्रसंचालन प्रशांत विजय काळे व वैष्णवी किशोर आहेर यांनी केले त्याचप्रमाणे शिक्षक झालेले आराध्या शिंदे व सोहम मुळे यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल भाषणातून माहिती सांगितली.
तसेच शाळेतील ज्ञानेश्वर सुरसे सर व प्रभाकर आहेर सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. इतर शिक्षिका वंदना इंगोले, मनीषा डोखे, रोशनी ठेंगे, अर्चना इंगोले, ज्योती बोरसे, प्राजक्ता काकळीज, भाग्यश्री सूर्यवंशी, कविता आयनोर, अमृता जाधव व योगिता सोनार यांनी संपूर्ण सजावटीचे कार्य केले. चेअरमन सर्व शाळेच्या शिक्षक शिक्षीका यांच्याकडून सर्व शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचा फुल व पेन आणि कॅडबरी देऊन सत्कार करण्यात आला अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments