गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली आहे. तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली की, तिची हत्या झाली या बाबत उलट सुलट चर्चा सुरू असुन घटनेचा नांदगांव पोलीस तपास घेत आहे.
या घटनेमुळे तळवाडे परीसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची खबर मयत विवाहीतेचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता. संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे. मुलीच्या मृत्यूने आई,वडील आणि माहेरची मंडळी शोकमग्न झाले आहे. दरम्यान गायञी हिचेवर उशिराने तळवाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान गायत्रीच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची मुलगी असा परिवार असुन मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.
0 Comments