४० गांव ते मनमाड लोहमार्गावर आढळले दोन अज्ञात तरुणांचे मृतदेह

 Bay- team aavaj marathi

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव ते ४० गांव व नांदगांव ते मनमाड लोहमार्गावर दोघे अज्ञात पुरुष वय ३५ ते ४० यांचा लोहमार्गावर कुठल्यातरी प्रवासी रेल्वे एक्सप्रेस मधून खाली पडून मृत्यु झाला आहे. 
या दोघांचे मृतदेह चे फोटो नांदगांव पोलिसांनी ओळखीसाठी ठेवले असून दोघांच्या मृतदेहाचे अंत्यविधी करण्यास आले आहे.

पैकी एक अज्ञात व्यक्ती वय ३५ ते ४० याचे वर्णन उंची पाच फुट पाच इंच, शरीर बांधा सडपातळ, रंग काळा- सावळा, डोक्याचे केस काळे दाढी बारीक, निळ्या रंगाची फुल पँट, तपकिरी रंगाचा पट्टेवाला फुल शर्ट, डाव्याहातात चांदीचे रंगाचे कडे दोन रबरी कंगन, उजव्या हातावर राजवंसी नाव गोंधलेले अशा वर्णनाचा व्यक्ती व अन्य एक असे दोन अज्ञात पुरुष लोहमार्गावर मयत झाले आहेत.

वरील वर्णन असलेल्या व्यक्ती बाबत कोणास तपास लागल्यास नांदगांव पोलिस यांच्याशी संपर्क साधावा असे तपास ठाणे अमलदार प्रवीण मोरे व पो ह जाधव यांनी केले आहे. दरम्यान दि १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ : ३० वा.नांदगांव ४० गांव लोहमार्गावर पिंपरखेड ते न्यायडोंगरी दरम्यान डाऊन लोहमार्गावर अज्ञात पुरुष वय सुमारे ३५ वर्षे यांचे प्रेत लोहमार्गाच्या बाजूला पडून होते.घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तर दुसरी घटना दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या पूर्वी नांदगांव ते मनमाड लोहमार्गावर पांझन ते हिसवळ दरम्यान अज्ञात पुरुष वय ३५ वर्षे याचे प्रेत पडून होते. दोन्ही घटनेचा तपास नांदगांव पोलिस करीत आहे

Post a Comment

0 Comments