नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथजी महाराज सेवाभावी संस्था संचलित एम.डी काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे म. गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व प्रथम रघुपति राघव राजाराम पतित पावन सिताराम, ईश्वर अल्ला तेरे नाम सबको संमती दे भगवान ही प्रार्थना, व जय जवान जय किसान या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील एम.डी काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल मध्ये शाळेत दिनांक 01 ऑक्टोंबर मंगळवार रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे चेअरमन श्री दिनेश काळे सर उपस्थित होते.यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नेहा काळे मॅडम व व्हाईस प्रिन्सिपल साक्षी अहिरे यांनी मुलांना माहिती सांगितली. यावेळी नर्सरी ते सहावी विद्यार्थ्यांनी सुंदर असे भाषणे केली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता जाधव यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर सुरसे, व श्री प्रभाकर आहेर सर,वंदना इंगोले, रोशनी ठेंगे मनीषा डोके, अर्चना इंगोले, ज्योती बोरसे, प्राजक्ता काकळीज भाग्यश्री सूर्यवंशी, कविता आयनोर, व योगिता सोनार यांनी परिश्रम घेतले.
0 Comments