क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी आणि परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २३ ते २६ सप्टेंबर या दरम्यान राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात नाशिक विभागातील नांदगाव येथील कासलीवाल विद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींचा संघ तिसऱ्या क्रमांकाने विजयी ठरला.
सविस्तर वृत्त असे की, टेबल टेनिस स्पर्धेत राज्यातील ३६ जिल्ह्यातील ८ विभागातील ५४ संघांचे ४७० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत नाशिक विभागातील नांदगाव येथील जे टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघ कोल्हापूर सोबत अटीतटीच्या सामन्यांमध्ये राज्यांमध्ये तिसऱ्या क्रमांका - साठी विजयी ठरला.
या स्पर्धेत सहभागी खेळाडू कॅप्टन श्रावणी गायकवाड, वैष्णवी पाटील, क्रांती इंगोले, वैष्णवी खैरनार, ऋग्वेदा राव ओंदरे यांनी आपले कौशल्य पणाला लावले. सर्व सहभागी खेळाडूंना मार्गदर्शक म्हणून क्रीडा शिक्षक अशोक बागुल, राहुल त्रिभुवन, प्रियंका खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. तर संघ व्यवस्थापक म्हणून सुषमा काळे व गिरीश पांडे यांनी काम पाहिले. सर्व सहभागी खेळाडूंचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनिलकुमार कासलीवाल, खजिनदार श्री.विजुभाऊ चोपडा,प्रमिलाताई कासलीवाल, सुशिल कुमार कासलीवाल, श्री. जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, प्राचार्य श्री मनी चावला, मुख्याध्यापक श्री शरद पवार तसेच श्री.विशाल सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खुप कौतुक व अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments