आ. सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव येथे आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेच्या सहाव्या दिवशी मंगळवारी पंडित प्रदीप मिश्रा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईला राज्य माता घोषित केल्याने सर्व मंत्रीमंडळाचे आभार व्यक्त केले.
यावेळी आ सुहास अण्णा कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांनी या कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासन, पत्रकार आरोग्य विभाग इत्यादी सर्वांचे व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते, महिला व मोठ्या प्रमाणात नागरिकांनी श्रमदान केले या सर्वांचे मनस्वी आभार मानले.आणि उद्या या शिव महापुराण कथेचा शेवटचा दिवस असल्याने आज रात्रभर देवाचे, किर्तन वगैरे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी कार्यक्रमासाठी देखील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावे असे म्हटले.
आज शिव महापुराण या कथेचे श्रवण करण्यासाठी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक उपस्थित होते. त्यांनी भाविकांनी आवाहन केले की, दोन दिवसांनी सुरू होत असलेल्या नवरात्र उत्सवात महिला आणि तरुणींना विनंती आहे की दांडिया साठी (गरबा खेळायला) जातांना भारतीय संस्कृती विसरु नका. आपल्या शरिरावर संपुर्ण वस्त्र परिधान करा.
आपले मयत झालेल्या पुर्वजांच्या मृत्यू तिथीला व पितृपक्षातील शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला पशुपक्ष्यांना आपल्या घरात शिजवलेले अन्न खावू घातले तरी आपले पुर्वजांचा आत्मा तृप्त होतो. त्याच बरोबर आपल्या पुर्वजांच्या स्मरणार्थ दरवर्षी फक्त एक वृक्ष लावा, त्याचे संवर्धन करा वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे.
याप्रसंगी प पू मिश्राजी म्हणाले की, संपूर्ण भुतलावर देवाधिदेव महादेवाचे मंदिर असे आहे की श्री गणेश, माता पार्वती,नाग,नंदी,असे परिवारासह आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच देवी देवतांचे त्यांच्या परिवारासह मंदिर नाही. त्यामुळे आपल्या काही ही समस्या असू द्या, फक्त महादेवाचे मंदिर दररोज जावून भक्तीभावाने एक लोटा जल आणि बेल अर्पण करून दर्शन घ्या आणि मनोभावे आपल्या समस्या देवाला सांगा आपल्या समस्या निश्चितच पूर्ण होतील, यात काही शंका नाही.
0 Comments