पेहेरकर परिवाराचा आधारवड हरपला, वै. हरीभाऊ बाबा पेहेरकर

 Bay -team aavaj marathi 

शब्दांकन:- प्रा. धनंजय नामदेव पेहेरकर.

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील पेहेरकर कुटुंब हे एक आदर्श कुटुंब म्हणून पंचक्रोशीत सर्वांना सुपरिचित आहे.अशा कुटुंबाचा आधारवड असलेले वै . ह.भ.प. हरिभाऊ बाळा पेहेरकर यांचे रविवार दिनांक 22/9/2024 रोजी वयाच्या 92 व्या वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती.

वै. ह. भ. प. हरिभाऊ बाळाजी पेहेरकर यांचा जन्म 01 एप्रिल 1933 साली झाला. वारकरी संप्रदायाचा संस्कार झालेले वै. हरी बाबा यांचे पूर्वार्धातील आयुष्य खूप कष्टमय गेले. मोल मजुरी करून, प्रसंगी ऊसतोड करून त्यांनी त्याकाळी आपल्या सहा मुलं व एक मुलगी यांचेवर उत्तम संस्कारात केले. त्यांना सहचरणी गं.भा जाईबाई हरी पेहेरकर यांची त्यांना खंबीर साथ लाभली. 

दरम्यान त्यांना पुत्र वियोगाचे 2 मोठे आघात झाले. बाबांच्या खांद्याला खांदा लावून परिवाराची धुरा वाहणारे बाबांचे ज्येष्ठ पुत्र वै.नामदेव हरी पेहेरकर यांचे 2001साली अपघाती अकाली निधन झाले. व बाबाचे दुसरे पुत्र कीर्तनकार कथाकार वै. जगन्नाथ हरी पेहेरकर यांचे 2021 मध्ये कोरोना काळात निधन झाले. त्या धक्क्यातून देखील बाबांनी स्वतः सह परिवाराला सावरले. बाबा हे कुटुंब वत्सल होते व आदर्शवत जीवन जगले.
सध्या त्यांच्या परिवारातील श्री एकनाथ हरी पेहेरकर व श्री नारायण हरी पेहेरकर हे आर्मी सेवेतून सेवानिवृत्त होऊन सध्या पुणे येथे पोलीस दलात कार्य करून देशसेवा करत आहेत. या शिवाय श्री निवृत्ती हरी पेहेरकर श्री. सोपान हरी पेहेरकर, मुलगी सौ. रुक्मिणी बाई दशरथ वाकचौरे (रा.खंडाळा) यांच्यासह नातू ,पणतू हे परिवाराच्या उत्तम संस्कारणे आदर्श व संपन्न जीवन जगत आहेत.

गावाशी नाळ जोडून असलेले सामाजिक सेवेत नेहमी अग्रेसर असलेले व सर्वांच्या सुखदुःखात तत्परतेने हजर असणाऱ्या पेहेरकर कुटुंबाचे आधारवड वैकुंठवासी हरिबाबा पेहेरकर यांच्या निधनाने गावातील सुसंस्कारी अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वां- च्या मनात दाटून येत आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच पिनाकेश्वर चरणी प्रार्थना.


Post a Comment

0 Comments