नांदगांव कृ.बा. सर्वसाधारण सभेत व्यापार्यांसमावेत शेतकर्यांचा सन्मान

 Bay- team aavaj marathi 

नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समितीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती श्री.सतिष बोरसे हे होते. यावेळी वार्षिक अहवालाचे व आर्थिक पत्रकांचेही वाचन सभेत करण्यात आले. पोखरी येथील सरपंच अँड. किरण गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला भाजीपाला विक्रीसाठी सर्व सुविधांयुक्त अशी बाजारपेठ उपलब्ध करून व्यापारी वर्गाची संख्या वाढवावी, लिलावाच्या पद्धतीत बदल करावा, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील गरजू शेतकरी वर्गाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करता येणे शक्य असेल तर ती करावी इत्यादी सुचना मांडल्या.

जास्तीत जास्त शेतमाल विक्री करणारे माणिकपुंज येथील शेतकरी लहु कडाळे यांचा सत्कार करतांना सभापती सतिष बोरसे, उपसभापती दिपक मोरे, संचालक एकनाथ सदगीर

 त्यावर सभापती सतिष बोरसे यांनी आलेल्या सुचनांचा आदर करून योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले. तसेच नांदगांव बाजार समितीचे कामकाज हे संपूर्ण संगणकीकृत पद्धतीने सुरू असून नांदगांव व बोलठाण यार्डवर शेतकरी वर्गाला शेतमाल विक्री केल्यानंतर पेमेंट हे रोख स्वरूपात कार्यालयातच देण्यात येत असून यासाठी व्यापारी वर्गासाठी नांदगांव व बोलठाण आवारावर नव्याने कॅबिन उभारण्यात आल्या आहेत. बोलठाण यार्डवर इले. वजन भुईकाटा बसविला जात आहे. तसेच शेतकरी वर्गासाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोलठाण यार्डवर वॉटर एटीएम सुरू करण्यात आले आहे. असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय बाजार समिती घेत असल्याचे सभापती सतिष बोरसे यांनी सभेत सांगीतले. 

या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी उपसभापती दिपक मोरे, संचालक एकनाथ सदगीर,अर्जुन पाटील, पोपट सानप,  साहेबराव पगार, अनिल वाघ, समाधान पाटील, जिवन गरुड, दर्शन आहेर, निलेश इपर, बाळासाहेब कवडे, सचिव अमोल खैरनार, शिवाजी बच्छाव, शिवाजी कदम, साकोरा ग्रा.प.सरपंच मधुकर सुरसे, गणेश बोरसे, जगन पाटील,पतींग बोरसे, त्र्यंबक बोरसे, सुरेश बोरसे, गोकुळ बोरसे, दिलीप कवडे, तुकाराम चव्हाण, काळु सानप, बाळासाहेब पवार, आण्णा शेलार, अनिल पवार , रविंद्र बुरकुल, सहाय्यक सचिव जितेंद्र गरुड, लेखापाल भाऊसाहेब आगवण आदिंसह ग्रामपंचायत व सहकारी सोसायटींचे प्रतिनिधी तसेच शेतकरी बांधव,व्यापारी, हमाल मापारी, कर्मचारी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन बाजार समितीचे अधिकारी बाबासाहेब साठे यांनी केले.



Post a Comment

0 Comments