अनेक ठिकाणी शिव महापुराण कथेचे वाचन केले परंतु नांदगाव सारखे सुक्ष्म नियोजन कोठे बघितले नाही - पं. मिश्रा

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव येथे आयोजित शिव महापुराण कथेचे श्रवण करण्यासाठी येणाऱ्या वृध्द, वयस्कर आणि अपंग भाविकांना कथा मंडपात व्यवस्थीत साठी व्यवस्था केल्यामुळे त्याचप्रमाणे पार्किंग पासून कथा मंडप पर्यंत भाविकांना घेऊन जाणे व आणणे. यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध केल्याबद्दल त्याचप्रमाणे कथेसाठी येणाऱ्या भाविकांचे मोफत भोजन व्यवस्था, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर त्याचे निराकरण करण्यासाठी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, राज्यातून तसेच येणाऱ्या भाविकांना कुठली प्रकारची तकलीफ होऊ नये यासाठी अतिशय सुक्ष्म नियोजन केले, त्यासाठी आ. सुहास अण्णा कांदे सौ.अंजुमताई कांदे यांचे आज कथेच्या तिसऱ्या दिवशी पंडित प्रदीप मिश्रा यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की देशात अनेक ठिकाणी मी शिव महापुरान कथेचे वाचन केले. परंतु आतापर्यंत सर्वात छान आणि सूक्ष्म नियोजन फक्त नांदगाव येथेच बघितले यासाठी सर्व भाविकांच्या वतीने आ.कांदे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

शिव महापुराण कथा सांगताना ते म्हणाले की, देवाधिदेव महादेवावर विश्वास ठेवा आपली काही समस्या असेल तर मनोभावे संकल्प करा महादेव आपली इच्छा अवश्य पूर्ण करेल याबाबत त्यांनी कथा वाचन सुरू असताना जळगाव तसेच राज्यातील इतर ठिकाणचे आणि परराज्यातील देखील भाविकांचे आलेले पत्र वाचून दाखवले तसेच आलेल्या भाविकांना बेलपत्र प्रसाद वाटप केला.विश्वास ठेवा या मंडपात संकल्प करा आपल्या मनोकामना निश्चितच पूर्ण होतील. कुठलेही कार्य स्वार्थ मला ठेवून करू नका परोपकाराची इच्छा ठेवा देव निश्चितच आपल्या मनोकामना पूर्ण करेल. त्यांनी आ.सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव येथे मनमाड रोडवर हिसवळ शिवारात आयोजित शिव महापुराण कथा सांगताना पुरावा म्हणून उपस्थित अनेक भाविकांचे पत्र वाचून दाखवले.

श्री क्षेत्र काशी येथून कथा ऐकण्यासाठी आलेल्या पती-पत्नी यांनी भावुक होऊन आ. कांदे यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी पंडित मिश्रा यांना पत्र पाठवून आ.कांदे यांच्यासोबत सेल्फी फोटो घेणे बाबत विनंती केली. असता त्या पती- पत्नीची इच्छा पूर्ण करूण आ.कांदे यांनी त्यांच्यासोबत सेल्फी फोटो घेऊन त्यांचा सन्मान केला.याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांमध्ये पुरुषांपेक्षा महिला भाविकांची उपस्थित लाक्षणिक होती.


 

Post a Comment

0 Comments