नांदगाव तालुक्यातील दहेगाव येथील आण्णा साळुबा कर्नल यांच्या शेतात काम करण्यासाठी गुरुवार दिनांक २४ रोजी सकाळी नांदगाव शहरातील दत्तनगर आणि नेहरु नगर गंगाधरी येथील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली नाल्यात पलटी झाल्याने दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या खरीप हंगामातील मका कपाशी इतर पिके काढणीस आले असताना परतीच्या पावसाने नुकसान टळावी यासाठी सर्व शेतकरी बांधवांची लगबग सुरू असल्याने दहेगाव येथील आण्णा साळुबा कर्नल यांच्या शेतात काम करण्यासाठी गुरुवार दिनांक २४ रोजी सकाळी नांदगाव शहरातील दत्तनगर आणि नेहरु नगर गंगाधरी येथील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली नाल्यात पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाच्या बाजूला मडगार्डवर बसलेल्या महिला मजूर आशाबाई चंद्रभान त्रिभुवन वय ६५ रा..नेहरुनगर, नांदगाव, व ताराबाई रविंद्र भवर वय ४० रा.दत्तवाडी गंगाधरी नांदगाव या जागेवरच ठार झाल्या. दरम्यान शेती कामासाठी सहा मजूर ट्रॅक्टर वर जात होते त्यापैकी इतर जखमी झाले असल्याचे समजते.नांदगाव ते दहेगाव हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याचे सांगण्यात येत असून या रस्त्याचे काम करण्याची मागणी नागरिकांनी केली.
तर अरुण दशरथ यशवंते हे जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर चालक शिंदे व इतर महिला मजूर किरकोळ जखमी झाल्या आहे. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांना अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन इतर जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवीले.
0 Comments