Bay -team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील बाणगाव बुद्रूक येथे शनिवारी ता२६ रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास तीन मेंढपाळांचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बाणगंगानदीवर आसलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या किनारी मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चारत असताना लहान मुलगा वाल्मीक बापू इटनर (वय१५) हा मेंढी पाण्यात धूत असताना तो पाण्यात पडला असल्याचे हे जवळच असलेल्या त्यांची आई इंदूबाई बापू इटनर वय (३५) यांनी बघितले व घाईघाईने मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात गेली, हे दोघे मायलेक पाण्यात बुडताना इंदूबाई यांनी बघितले आणि त्यांना वाचवण्या-साठी मुलाची (मामी) अंबादास खरात च्या पत्नीने मदतीसाठी आवाज दिला. जवळच असलेल्या मुलाचा मामा अंबादास केरूबा खरात वय २९ रा खिर्डी ता.नांदगाव हा दोघांना वाचवण्या -साठी पाण्यात गेला. या तिघांनाही पोहत येत नसल्याचे व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने आगोदर मुलगा त्यास वाचवण्यासाठी गेलेली आई आणि भाचा व बहिणीस वाचवण्यासाठी गेलेला मामा असे तिघे पाण्यात बुडाल्याने त्यांच्यावर काळाने झडप घातली.
हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच मयत अंबादास खरात च्या पत्नीने तिघांना वाचविण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत जवळील वस्तीवर नागरिकांना आवाज दिला हा आवाज ऐकून मुंबई पोलीस मनोहर बागुल याने धावत जात पाण्यात पोहत बुडालेल्या ना शोधण्याचा आटोक्यात प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच येथील गावातील बाळू गोसावी,रमेश मोरे,गजानन तांबे यांनी शर्तींचे प्रयत्न करत या तिघांना बाहेर काढले व पण पाण्यातून बाहेर काढले. तिघांना पाण्यातून बाहेर काढताना उशीर झाल्याने तिघांचा ही दुर्दैवी मृत्यू झाला होता.
झालेल्या घटनेची माहिती येथील पोलीस पाटील वाल्मीक गोराडे, सागर बागुल यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात कळविले माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले.या घटनेतील दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेले नांदगाव तालुक्यातील खिर्डी येथील राहणारे होते. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला जात होता, घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.
मागील तीन दिवसापासून गुरुवारी दहेगाव नांदगाव रस्त्यावर ट्रॅक्टर खाली दाबून तिघे मजूर ठार,शुक्रवारी बाण गावला युवा शेतकऱ्याचा विजेच्या धोक्याने मृत्यू तर शनिवारी बाणगाव ला बंधाऱ्यात तिघांनचा बुडून दुर्देवी मृत्यू बाणगाव व परिसरातील भागात झाल्याने दिवाळीच्या सणाच्या प्रारंभी दुर्देवी घटनेने गरीब कुटुंबावर दिवाळी सणावर दुःखाचे सावट आले असल्याने या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
.
0 Comments