समिर भुजबळ यांनी भयमुक्त नांदगाव या मुद्यावर विधानसभेसाठी नामांकन केले दाखल

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)  

भयमुक्त नांदगांव प्रगत नांदगांव या मुद्दयावर माजी खा.समिर भुजबळ यांनी आज सोमवार दिनांक २८ रोजी भव्य रॅलीच्या माध्यमातून सभेचे आयोजन करुन मतदारांना मार्गदर्शन करुन नंतर अर्ज दाखल केला, यावेळी शहरातील सर्वच मुख्य मार्गावर नागरिकांची गर्दी झाली होती.

समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि नांदगाव मतदारसंघाच्या विकासाबाबत आपली बांधिलकी व्यक्त केली. त्यांनी आपल्या प्रचारात स्थानिक विकासकामे, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर भर देण्याची घोषणा केली आहे. भुजबळ यांची अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी जैन धर्मशाळा येथे सभेचे आयोजन करून उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कळवाडी, निमगांव, साकोरा, बोलठाण, जातेगांव मनमाड नांदगांव, भालुर, मांडवड, गट गणातील नागरीक उपस्थित होते यावेळी आर.पी.आय व विविध संघटनांनीही पाठिंबा जाहिर केला.

नामांकनासाठी तालूक्यातुन ठिकठिकाणाहून आलेल्या महिला व नागरिक मुळे सकाळी ११ ते दुपार ३ वाजे पर्यंत नांदगांव शहरात रहदारीची समस्या निर्माण झाली होती. पो. नि. प्रितम चौधरी यांनी स्वतः लक्ष घालीत रहदारी सुरळीत केली. 

Post a Comment

0 Comments