जामदरी येथील ५२ व्या विज्ञान प्रदर्शनात ७७ प्रतिकृती बघण्यासाठी मान्यवरांची उपस्थिती

 Bay -team aavaj marathi 

 मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जामदरी येथे ५२ वे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते, या विज्ञान प्रदर्शनामध्ये विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी एकूण ७७ प्रतिकृती दाखल होत्या. त्या बघण्यासाठी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.या प्रदर्शनात जामदरीचे सौर उर्जेवर चालणारे ट्रॅक्टर न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव चे हाय जैनिक हायजनिक युरिनर क्लीनर या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.  

या दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सराई शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस घनश्याम इनामदार होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये श्रीमती साळुंके राज्य अध्यक्ष विज्ञान अध्यापक संघाचे दिनेश पवार, नाशिक जिल्हा अध्यक्ष संघाचे अरुण पवार, प्रशिक्षक तालुका विज्ञान अध्यापक संघाचे मुख्याध्यापक अशोक कदम तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. 

विज्ञान प्रदर्शनात ७७ आशा प्रकृती मांडण्यात आल्या होत्या प्रशिक्षकांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला अखेरच्या दिवशी सर्व तालुक्यातील सहभागी विद्यार्थी सहभागी शिक्षक मान्यवरांना विद्यालयाच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले. जामदरी येथील सर्जेराव दादा माध्यमिक विद्यालयाच्या पहिली ते आठवी प्रथम सौर ऊर्जा वर चालणारे ट्रॅक्टर या प्रतिकृती साठी प्रथम, नांदगाव येथील के एम के विद्यालयास ऑटोमोटेड बॉर्डर सिक्युरिटी या प्रतिकृती साठी द्वितीय तर मांडवड च्या जनता विद्यालय क्लीनर मशीन या प्रतिकृती साठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. 

तर उत्तेजनार्थ सोलर ग्रॉस कटर व्ही.एन. नाईक हायस्कूल मनमाड, इयत्ता नववी ते बारावी प्रथम प्रथम हायजेनिक युरीनल क्लीनर इंग्लिश स्कूल नांदगाव, द्वितीय विद्युत नियंत्रण माध्यमिक विद्यालय साकोरे, तृतीय प्राणी शेड सुरक्षा यंत्र के एम के विद्यालय नांदगाव, उत्तेजनार्थ प्रकाशित होणारे दिवा न्यू इंग्लिश स्कूल पळाशी, नववी ते बारावी दिव्यांग प्रथम .इंधन व प्रदूषणमुक्त सुरक्षित रस्ते उच्च माध्यमिक आश्रम शाळा अमोदे, शैक्षणिक साहित्य प्राथमिक प्रथम विकसित भारत जिल्हा परिषद शाळा काळे वस्ती ,शैक्षणिक साहित्य माध्यमिक प्रथम प्रथम मॅथेमॅटिक्स विजय स्कूल नांदगाव ,प्रयोगशाळा परिचर प्रथम कटर मशीन लोकनेते कै.ॲड. विजय शिवराम आहेर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय न्यायडोंगरी यांना देण्यात आले.

यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम सर आणि नांदगावचे माजी नगराध्यक्ष शिवाजी पाटील पत्रकार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जामदारी येथील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच जामदरी आदीसह विधी विविध नामवंत व्यक्ती यांनी याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.


 

Post a Comment

0 Comments