नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयात शुक्रवार दि.२७ डिसेंबर रोजी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी (ग्राम विकास अधिकारी) प्रमोद बोडके हे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवावी. ग्रामीण भागात सुद्धा भरपूर गुणवत्ता असते, आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे म्हणाले.
याप्रसंगी त्यांच्या वतीने विद्यालयास त्यांचे तर्फे स्मार्ट टी.व्ही.भेट दिला. व ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेता माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौर ऊर्जा (सोलर पॅनल) बाबत विचार करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विजय चोपडा हे होते. श्री चोपडा यांच्या दूरदृष्टी मुळे मागील वर्षभरात विद्यालयाची चांगली भौतिक प्रगती झाली आहे असे मुख्याध्यापक D. R. सोनवणे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. तसेच वर्षभरातील कामकाजाचा धावता आढावा मुख्याध्यापक सोनवणे यांनी सादर केला. याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आणि शैक्षणिक सुयश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
शाळेचे माजी विद्यार्थी कैलास काकळीज दर वर्षी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यासाठी पाच हजार रुपये देतात तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक संजय दीक्षित यांच्या तर्फे एक हजार पाचशे रुपये रोख बक्षिस दिली जाते. विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे सचिव भाऊसाहेब सोनवणे यांनी दर वर्षासाठी रोख दोन हजार पाचशे रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष योगेश काकळीज यांनी शाळेच्या जिल्हा स्तरावर निवड झालेल्या एकांकिका 'मोकळा श्वास लोककलेला' कलाकारांसाठी रोख पाचशे रुपयांचे बक्षीस दिले. विद्यालयाच्या वतीने सर्वांचा मुख्याध्यापक सोनवणे सर यांनी सत्कार केला. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब खैरनार, माजी शिक्षक पोपट चव्हाण, यांच्यासह भीमराव गांगुर्डे, शरद उशीरे आणि पालक उपस्थित होते. सर्व सत्कारार्थीचे अध्यक्ष विजय चोपडा यांनी अभिनंदन केले. सुत्रसंचलन रत्नप्रभा पाटील, परिचय ज्योत्स्ना चव्हाण यांनी केले. तर उपस्थितांचे आभार सुनील हिंगमीरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक दिलीप भडांगे, प्रशांत वाघ, रोहिणी गोराडे, योगेश कुलकर्णी, नंदू दवांगे, ऋषी डोमाडे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
0 Comments