मनमाड -नांदगाव रेल्वे लाईनवर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 मनमाड - नांदगाव रेल्वे स्टेशन दरम्यान काल दिनांक 26 डिसेंबर रोजी लोह मार्गावरील पोल क्रमांक 283/ 6 व पोल क्रमांक 283 /8 दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशन ते पांझण रेल्वे स्टेशन दरम्यान एक अज्ञात मृत व्यक्ती रेल्वे कर्मचाऱ्यांना आढळून आला असून त्यांनी या संदर्भात खबर नांदगाव पोलिसांना देऊन त्याची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.

मयत व्यक्ती गंभीर जखमी होऊन मृत झालेला आहे त्या व्यक्तीचा गाडीतून एक्सप्रेस मधून पडून मृत्यू झाला सदर अज्ञात मृत व्यक्तीचे वय सुमारे 30 ते 35 असून वर्ष त्याची उंची पाच ते साडेपाच फुट असून मृताच्या अंगावर पोपटी रंगाचा टी शर्ट, आणि काळया रंगाची  पॅन्ट, टी-शर्ट मेहंदी कलर, अशा वर्णनाची व्यक्तीचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आला सदर व्यक्तीचा मृत्यू गाडीतून पडून झाला की अन्य कारणाने झाला याचा पोलीस शोध घेत आहे. 

असे वर्णन आहे. सदर व्यक्ती प्रवास करताना मृत्यू झाला असावा असा अंदाज केला. या घटनेचा नांदगाव पोलीस शोध घेत असून या घटनेची अकस्मित मृत्यू नोंद झालेली आहे. अज्ञात मृत व्यक्तीच्या व्यक्तींनी वर्णनावरून त्याचा अंदाज बांधून पोलिसांशी संपर्क करावा असे आव्हान नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments