वन विभागाच्या कार्यालय बाहेर वन मजुराने केला आत्मदहनाचा प्रयत्न... सटाणा येथील धक्कादायक घटना.. आगीत मजूर 80 टक्के भाजला

  भागवत झाल्टे प्रतिनिधी चांदवड नाशिक  

नाशिक जिल्ह्यातील बागलाण मधील ताहाराबाद येथील वन विभागाच्या कार्यालय बाहेर एका वन मजुराने अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेत, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून या वन मजूराचे नाव राजेंद्र साळुंखे असे आहे.

साळुंखे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापुर्वी सागर पाटील मुर्दाबाद अशा घोषणा देत स्वतः च्या अंगावर डिझेल ओतून घेऊन आगपेटीची काडीने पेटवून घेतले घडलेला प्रकार पाहून उपस्थित कर्मचाऱ्यांनी तत्काळ राजेंद्र साळुंखे यांच्या अंगावर पाणी टाकून व सुती कापड टाकून त्यांच्या कपड्याची आग विझवून त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

सागर पाटील हे वन पाल असल्याचे समजते या घटनेत साळुंखे 80 टक्के भाजला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.साळुंखे गेल्या पंचवीस वर्षांपासून वन मजूर म्हणून काम करत आहे मात्र इतके वर्षे उलटून देखील त्याला नोकरीत कायम न करण्यात आल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले असून आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


  

Post a Comment

0 Comments