किसान माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

 BAY -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

वाखारी ता. नांदगाव येथील किसान माध्यमिक विद्यालयात दि.२६ जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्र. मुख्याध्यापक सुनील हिंगमीरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावात प्रभातफेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत झाल्यावर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी उपस्थितांना संबोधित केले.

याप्रसंगी विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब खैरनार, उपाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष योगेश काकळीज, सचिव भाऊसाहेब सोनवणे, उपसरपंच अनिता काकळीज, पोलीस पाटील चेतना चव्हाण, केंद्रप्रमुख संजय देसले, माजी शिक्षक पोपट चव्हाण, आरोग्य विभागाच्या जयश्री सुर्वे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य, तलाठी तात्या, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत आहिरे आणि शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट कार्यकर्त्या, आरोग्यसेविका, पशुवैद्यकीय अधिकारी, कृषी सेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले. त्यानंतर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे त्रैमासिक ज्ञानयात्रीचे मान्यवरांच्या आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. ना.शि. प्र. मंडळाच्या पतसंस्थेतर्फे गुणवंत पाल्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. 

शालेय समितीचे अध्यक्ष विजय चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाशिक येथे सादर केलेली 'नवा श्वास लोककलेला' या एकांकिकेतील सर्व कलाकारांना लेखन पॅड बक्षीस देण्यात आले. तसेच नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडा महोत्सवात सरस ठरलेल्या १४ वर्षाखालील खो-खो संघातील खेळाडूंना बक्षीस देण्यात आले.
 
सूत्रसंचालन रत्नप्रभा पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप भडांगे, नंदू दवांगे, प्रशांत वाघ, योगेश कुलकर्णी, रोहिणी गोराडे, ऋषीकुमार डोमाडे, ज्योत्स्ना चव्हाण यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments