Bay -team aavaj marathi
महादु मोरे मेशी देवळा तालुका (प्रतिनिधी)
देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालयात 76 भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच योगेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य यांना शाहू गंगाधर शिरसाट यांना मान मिळाला होता तरी तो मान त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी (सफाई कामगार) राजू शिंदे यांना दिला. त्यानंतर जनता विद्यालयात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य,गाणी , सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण असून तो दरवर्षी २६ जानेवारीला साजरा केला जातो. १९५० साली भारताने आपला संविधान स्वीकारले आणि भारत प्रजासत्ताक देश बनला, म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
यावेळी सरपंच, बापुसाहेब जाधव,उपसरपंच योगेश चव्हाण, सतीश बोरसे,शाहू शिरसाठ,समाधान गरुड, माजी प. स. सभापती केदा शिरसाठ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीला आहेर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शिरसाठ,तुषार शिरसाठ , पवन गरुड आदींसह ग्रामस्थ व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
जनता विद्यालय येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र मोहन सर यांनी केले तर सूत्रसंचालन चेतना सोनवणे, ज्ञानेश्वरी शिरसाठ या विद्यार्थिनींनी केले. हर्षल जाधव सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य गोरख निकम,प्रा.नितीन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण भावसार, मयुर,सोनवणे, राजेंद्र गोविल,राकेश निकम,रामदास बागुल, गिरीष चावान शाम सोनवणे,प्रशांत खरे,दीपक गवळी,विलास महाले,योगेश बोरसे,यश शिरसाठ, मनीषा जोने,वैशाली काकडे,मनीषा अहिरराव, शुभांगी बचाव, गायत्री मोरे, संगीता, आखाडे, राजेंद्र सोनवणे, राजेंद्र सदांशिव, पोपाट पगार,यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments