Bay-team aavaj marathi
स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक जी कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश जी शेवाळे देवा व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा तथा विश्वस्त सौ धनश्री ताई उत्पात तसेच सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवार दि.२६ रोजी ठीक ११ वाजता स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या बैठकीला सुरुवात करण्यात आली सदर बैठकीचे प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे यांची उपस्थिती होती.
त्यानंतर खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे यांचा जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड आणि जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विजय सपकाळे यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला भुसावळ तालुकाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांचा सत्कार तालुका सहसंघटक पवन कोळी यांनी केला तसेच भुसावळ तालुका संपर्कप्रमुख इमरान खान यांचा सत्कार प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पाटील याच्या हस्ते करण्यात आला.चोपडा तालुका कार्याध्यक्ष मिलिंद वाणी यांचा सत्कार भुसावळ तालुकाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांचा हस्ते करण्यात आला.सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र देण्यात आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या व संघटना बळकट वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय व बैठकीचे मुद्दे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे काम काय असते व संघटना वाढीसाठी काय करावे माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कशाप्रकारे काम करावे या विषयावर खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे यांचे विशेष मार्गदर्शन केले.
भुसावळ तालुकाध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी देखील थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व संघटनेचे ध्येय धोरण व संघटने बद्दल माहिती दिली.जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी संघटनेमध्ये मागील दोन ते तीन वर्षापासून संघटने सोबत असून काम करत असताना आलेले अनुभव व संघटने प्रति एकनिष्ठेणे केलेले काम व कार्य वरिष्ठांचे मार्गदर्शनामुळे मी आज न डगमगता काम करत आहे सामाजिक कार्य करत असताना शासकीय कार्यालयातील कारभार पारदर्शक व्यवहार टिकून राहावी किंवा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग कसा करावा व माहिती अधिकार कायदा कशा पद्धतीने वापर करावा याबद्दल मार्गदर्शक केले तसेच संघटना वाढीसाठी देखील आश्वासन दिले त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष विजय सपकाळे यांनी देखील आपला परिचय करतेवेळी मला देखील स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण संघटनेचे कामकाज आवडले व संघटनेमध्ये काम करण्यासाठी मला देखील आत्मविश्वास चांगल्या प्रकारे मिळेल व संघटनेत काम करताना मला पाठबळाची आवश्यकता होती ती आता मला संघटनेमुळेच त्यांनी संघटनेचे कामकाज ध्येय धोरण या नुसारच काम करण्याबाबत सांगितले.
येणाऱ्या काळात आपण संघटनेचे काम फार मोठ्या प्रमाणात करू व संघटना बळकट करू असे आश्वासन बैठकीत दिले.बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी केले तसेच बैठकीचे नियोजन खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे व जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होते.बैठकी च्यावेळी खानदेश प्रमुख राजेंद्र वानखेडे,जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष विजय सपकाळे,जिल्हा संपर्कप्रमुख महेंद्र चौधरी,भुसावळ तालुकाध्यक्ष मिलिंद सोनवणे,तालुका संपर्कप्रमुख इम्रान खान,चोपडा तालुकाध्यक्ष सुनील पावरा,तालुका उपाध्यक्ष रवींद्र कोळी,तालुका कार्याध्यक्ष मिलिंद वाणी,तालुका सहसंघटक पवन कोळी,तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पाटील,तालुका सचिव अविनाश बाविस्कर,तालुका संपर्कप्रमुख महेंद्र पाटील,तालुका संघटक खलील तडवी उपस्थीत होते.सदर कार्यक्रमासाठी सहकार्य तालुका प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पाटील आणि तालुका सहसंघटक पवन कोळी यांनी केले.बैठकीनंतर उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष विजय सपकाळे व तालुका चंद्रकांत पाटील यांनी मानले.
0 Comments