राजापूर येथील वसंतराव नाईक विद्यालयात प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न,

 Bay -team aavaj marathi 

सचिन बैरागी पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील राजापूर येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन व वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक माननीय श्री. संपत भाऊ वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक माननीय श्री. रमेशभाऊ वाघ तसेच संस्थेचे माजी संचालक, भारतीय सैन्य दलातील सैनिक बांधव, राजापूर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, वि. का.सो. चेअरमन, व्हा.चेअरमन ,सदस्य, सर्व वर्तमानपत्रांचे पत्रकार बांधव हे होते.

 याप्रसंगी  संस्थेची संचालक माननीय श्री संपत भाऊ वाघ, संस्थेचे संचालक माननीय श्री रमेशभाऊ वाघ , फौजी बांधव व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते* क्रांतिवीरांच्या पुतळ्याचे व शहीद पोलीस भास्करराव सानप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वज पूजन करण्यात आले याप्रसंगी *संस्थेचे संचालक मा. श्री. रमेशभाऊ वाघ यांनी ध्वजारोहण केले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, ध्वज गीत ,राज्य गीत सादर केले.मान्यवरांच्या शुभहस्ते दोन्ही संचालकांच्या विशेष प्रयत्नतून संस्थेकडून प्राप्त संगणक लॅब चे तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदीप सांगळे सर यांच्या प्रयत्नातून पदवीधर आमदार मा.डॉ. सत्यजित तांबे यांच्याकडून प्राप्त झालेल्या (ध्वनिक्षेपक) साऊंड सिस्टिम चे उद्घाटन, करण्यात आले. तसेच संचालक रमेश भाऊ वाघ यांच्या प्रयत्नातून श्री सागर भाऊ विंचू यांच्या कडून 40 हजार रुपये किमतीचा All in One Computer विद्यालयाला भेट दिला. प्राचार्य सांगळे सर यांनी विद्यालयास संविधान प्रतिमा सप्रेम भेट दिली. त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होऊन सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन ,मोबाईलचे दुष्परिणाम, बुवाबाजी, समाजातील वाईट प्रवृत्ती, इ . विषयांवर नाटिका तसेच अनेक देशभक्तीपर गीतांचे, मराठमोळ्या गीतांचे, सादरीकरण केले, याप्रसंगी *संस्थेचे संचालक माननीय श्री.संपतभाऊ वाघ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक माननीय *श्री .रमेशभाऊ वाघ यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रीय पातळीवरील केरळा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे संचालक श्री.संपतभाऊ वाघ आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.अनेक मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक माननीय श्री. संपुतभाऊ वाघ, संस्थेचे संचालक माननीय श्री. रमेशभाऊ वाघ, विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदीप सांगळे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले* या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री संपतराव वाघ व श्री रमेशभाऊ वाघ यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य श्री  सांगळे  सर व  इतर जेष्ठ शिक्षकांचा कार्यक्रम यशस्वी  केल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *पर्यवेक्षक श्री. सानप डी. एन .सर. ज्येष्ठ शिक्षक श्री कांगणे जी.आर सर, कॉलेज विभाग प्रमुख दराडे बी एस सर , सांस्कृतिक  समितीचे सचिव , व सर्व सदस्य, तसेच सर्व इयत्तांचे वर्गशिक्षक, सर्व शिक्षक, प्राध्यापक बंधू-भगिनी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर, बंधू भगिनी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी, यांनी विशेष परिश्रम घेतले.* मंडप व्यवस्था करणारे श्री सागर चव्हाण, श्रीराम मंडप व साऊंड सिस्टिम चे किशोर भाऊ आणि खैरनार भाऊ तसेच श्री. भाग्येश पहाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. 

यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, सहसचिव व सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी ,सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, व सर्व शिक्षक वृंद, तरुण मित्र मंडळ, एस टी महामंडळ, पोलीस विभागाचे कर्मचारी ,राजापूर पंचक्रोशीतील अनेक पालक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री .पी. एस .सांगळे सर यांनी केले.तर सूत्रसंचालन श्री.अनिल कोतकर सर आणि आभार प्रदर्शन श्री वाघ आर बी सर यांनी केले. याप्रसंगी राजापूर व पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व पालक वर्ग,  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments