Bay -team aavaj marathi
प्रज्ञानंद जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव शहरातील लक्ष्मी थिएटर मागील इंद्रायणी नगर नगर येथे राजवीर उर्फ सम्राट जाधव या बालकाच्या घरासोमोर मोठे आंब्याचे व कडू लिंबाचे दोन वृक्ष आहेत आणि बखळ प्लॉट चे मैदान आहेत बाजूला महादेवाचे मंदिर आहेत तिथे देखील अनेक वृक्ष लावलेली असल्याने अनेक प्रकारचे पक्षांची याचं झाडावर वास्तव्य आहे.
एका साळुंकी पक्षाच्या पायाला पतंगाचा झाडाला अडकलेला मांजामुळे पायाला दुखापत झाल्याने तो जमिनीवर कोसळला होता.परिसरात भटकनार्या काही कुत्र्यांनी लगेचच या जखमी साळुंकी पक्षावर झडप घातली.
हे दृश्य राजवीर उर्फ सम्राट या ४.६ वर्षाच्या बालकाने बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बघताच त्याने क्षणाचा विलंब न लावता आपल्या वडिलांना वरील हकिकत सांगितली, त्यांनी तत्काळ भटक्या कुत्र्यांना हाकलुन पक्षाचा प्राण वाचवला आहे हे केवळ राजवीर उर्फ सम्राट या चार वर्षीय बालकाच्या सतर्कतेमुळे त्या इवल्याशा पक्षाचे प्राण वाचले. यावेळी पक्षाला मरणाच्या दारातून ओढून आणले आहे या पक्षाचे प्राण वाचल्याने जाधव कुटुंब अतिशय आणंद व्दिगुणित झाला.
त्यांनी प्राणी, पक्षी, सर्पमित्र गणेश देशमुख यांना बोलुन घेतले त्यांनी तातडीने येऊन साळुंकी पक्षी प्रजातीचा असल्याचे सांगितले व राजवीरचं कौतुक करत त्याच्याच हाताने या जख्मी पक्षाला पाणी पाजले व प्रथम उपचार प्रक्रिया चालू केली असता या पक्षाने प्रतिसाद दिला. पुढील माहिती दिली या नवीन पिढीवर अशाच प्रकारे संस्कार राहिलेत तर पक्षी, प्राणी मात्रा वर एक कौटुंबिक नातं राहील व चांगल्या प्रकारे समाजात संदेश पोहचू शकतो.काही तासाने साळुंकी पक्षी याच्यावर उपचार केले असता तो ठणठणीत झाला असुन धोक्याच्या बाहेर आहे दोन तीन दिवसात त्याला पुन्हा निसर्गाचा आनंद घेता येईल.
0 Comments