चांदवड तालुक्यातील रायपूर येथील समिट रेल्वे स्टेशनवर मंडल अधिकारी दोन हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

 Bay- team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)

सातबारा मध्ये नोंद मंजुर करण्या करता दोन हाजाराची लाच घेतांना चांदवड येथील मंडल अधिकारी प्रविण गणपत प्रसाद हे समिट रेल्वे स्टेशनवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती. त्यांची सातबारा मध्ये नोंद करण्याकरता तक्रारदार यांनी तलाठी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज सादर केला असता तो मंडल अधिकारी यांच्याकडे मंजुरी साठी गेला असता या प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी १२ फेब्रुवारी रोजी याबाबत मंडल अधिकारी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळेस मंडल अधिकारी प्रविण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजुर करून देण्याचा मोबदल्यात २ हजार रुपयाची मागणी केली होती. त्याबाबत १३ फेब्रुवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती आज रोजी दोन हजार रुपये लाच पंचांसमक्ष स्विकारली म्हणून त्यांच्या विरुध्द चांदवड पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments