कासलीवाल माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची शिवसृष्टीस भेट विद्यार्थी रमले इतिहासात

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील कमलाबाई माणिकचंद कासलीवाल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दि. १५ फेब्रुवारी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सहजपणे जाणून घेता यावा यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून व दप्तर मुक्त आनंदी शनिवार या उपक्रमांतर्गत  नांदगाव येथे नव्याने साकारलेल्या 'शिवसृष्टी' या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची भेट देण्यासाठी नेले.

यावेळी तेथे पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी 'जय शिवाजी' 'जय भवानी' अशा घोषणा दिल्या. व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी शिवसृष्टी चा परिसर दणाणून सोडला गेला होता.

विद्यार्थ्यांनी शिवसृष्टी च्या ठिकाणी असलेल्या छत्रपतींच्या तैल चित्रांचे निरीक्षण व शिलालेख वाचन केले आणि शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी माहिती मिळवली. काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित पोवाडे शिक्षक व विद्यार्थी समोर सादर केले त्यात आदेश गुडेकर व अन्वी पवार या विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली. 

शिवसृष्टीस भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे युद्ध कौशल्य, गड किल्ल्यांविषयी माहिती तसेच महाराजांचे कार्य याबद्दल विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने समजावून घेता आले अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार , गोरख डफाळ यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सुनीलकुमार जी कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, गोरख डफाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व उपक्रमाचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेत.

Post a Comment

0 Comments