Bay- team aavaj marathi
प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील इंद्रायणी नगर येथील लिटिल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मैत्रिणींनी मध्ये 10 वी च्या निरोप सभारंभ प्रसंगी पालकांसह अश्रू अनावर अनेक वर्ष सोबत शाळेत हसलो खेळलो खोड्या काढल्या कसे दिवस गेले, समजलेच नाही.लहान से मोठे कधी झालो तेही कळलेच नाही. शाळेतील प्रत्येक शिक्षक, शिक्षिका, अँटी व्हॅन वाले काका सर्वांनी खुप जीव लावला "उद्याच भविष्य तुम्ही असणार मुलांनो" त्यामुळे अभ्यास करा असा कायम सल्ला देणारे सर्वांचेचं आभार यावेळी विद्यार्थीनींनी मानले होते.
सविस्तर माहिती अशी की आज रोजी 10 वी चा निरोप समारंभ शाळेच्या वतीने ठेवण्यात आला होता यावेळी शाळेचे संचालक संजय बागुल उपाध्यक्ष सरिता बागुल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा'निरोप समारंभ 'या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती प्रतिमेचे पूजन संचालक मंडळ व सार्थक बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. सन 2025 स्कूलची एस.एस.सी. सर्व प्रथम बॅच म्हणुन विद्यार्थ्यांना शालेय बॅचेस लावून फेटे बांधण्यात आले होते. सर्व विद्यार्थी वर्गाचे औक्षण अनिता जगधने यांनी केले.नंतर सर्व विद्यार्थी वर्ग, विद्यार्थ्यांचे पालक,वर्ग शिक्षक, तसेच शिक्षकांचे स्वागत गुलाब पुष्पांनी करण्यात आले.
इयत्ता 7 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवन, शैक्षणिक जीवन व मैत्रीबंध अतूट अप्रतिम नात्यावर सुरेख नृत्य सादर केले.नंतर सर्व शिक्षक शिक्षिका वृंद पांडे,उपाध्ये, सुरसे, जगधने, शिरसाट आपापल्या विषयांचे लेखन व नियोजन तंत्राविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शालेय जीवन, गोड आठवणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मा.मॅनेजमेंट विषयी कृतज्ञता उदगार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. संजय बागूल यांनी संस्कारपर नीतिमूल्ये व आधुनिक कर्तुत्ववान पिढी कशी व्हावी यावर अनमोल ठेवा विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिला.उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याच काय केव्हाही बांधता येईल क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.
स्कूल चे पालक दर्शना गोयकर यांनी स्कूलची शिस्तप्रियतेचे कौतुक करून मॅनेजमेंट व विषय शिक्षकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा सोनजे तसेच चंचल हिरे ह्या दोन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.आज संपूर्ण शाळेमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण होते.यावेळी मुलांना पुढील बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेतील सर्व मॅनेजमेंट तर्फे शुभेच्छा देण्यात आले.
0 Comments