बंजारा समाजाचे वतीने आ.कांदे यांचा सपत्नीक सत्कार सौ.कांदे यांनी स्विकारला सत्कार

 Bay -team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथे श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सोमवार दि १७ रोजी येथील श्री सावता कंपाऊंड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरा गड येथील महंत जितेंद्र महाराज यांच्या हस्ते आ.सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हा सन्मान आ. सुहास अण्णा यांच्या वतीने सौ अंजुम ताई कांदे यांनी या कार्यक्रमात स्विकारला.

या वेळी बोलतांना जितेंद्र महाराजांनी आ. सुहास आण्णा यांच्या कार्याची स्तुती केली, मागच्या वेळी आलो तेव्हा ज्याने बंजारा समाजाला मान पान दिला त्यालाच मतदान करण्याचे आव्हान केले होते आणि समाजाने माझ्या शब्दावर एकमताने सुहास अण्णांच्या पाठीशी उभे राहून अण्णासाहेबांना भरघोस मताधिक्याने निवडून दिल्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सौ.अंजुमताई कांदे आम्ही सर्व कुटुंबीय बंजारा समाजाचे उपकार कधीही विसरणार नाही. या पुढेही समाजासाठी कार्य करत राहणार असून भविष्यात संत सेवालाल महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रम प्रसंगी न्यायडोंगरी येथील मोरेश्वर नगर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक लोक गीतांवर नृत्य तसेच देशभक्तीपर नाटके सादर केली. तसेच बंजारा फेम ईशांत (गीतांजली) चव्हाण व कलाकारांनी विविध सांस्कृतिक लोकगीते व भक्ती गीते सादर केली. 

या कार्यक्रमास राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य अध्यक्ष भिकन जाधव, डॉ.उदय मेघावत, डॉ शांताराम राठोड, विजय चव्हाण, डॉ.शाम जाधव, बाबू तोताराम चव्हाण, समिती अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण, डॉ . प्रकाश चव्हाण, सोमनाथ पवार आणि समिती चे सर्व सदस्य तसेच बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे एन.के.राठोड यांनी प्रास्ताविक करताना संपूर्ण समाज आण्णांच्या पाठीशी कालही होता, आजही आहे आणि भविष्यात ही राहील असा बंजारा समाजाचे वतीने शब्द दिला.




.

Post a Comment

0 Comments