नांदगाव येथे नव्याने साकारलेल्या शिवसृष्टी तील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आ. सुहास अण्णा कांदे यांनी शिव जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी दि.१८ सपत्नीक केला दुग्धाभिषेक केला.
याप्रसंगी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने दूध व शुद्ध पाण्याने महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला. यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई यांनी महाराजांच्या पुष्पवृष्टी केली. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील जाधव तसेच शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिव छत्रपतींची आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीची सर्व सदस्य आणि पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
0 Comments