नांदगाव येथे मंगळवार दि.१८ रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य मनी चावला यांच्या हस्ते करण्यात आले. युकेजीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर करुन छत्रपतींना मानवंदना दिली. द्विज घुगे याने पोवाडा सादर केला. दर्शन आबड याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपट उलगडून दाखवला. युकेजी (रोझ) च्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर नृत्य सादर केले, नर्सरीच्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर अशा नृत्यविश्काराद्वारे अफजल खानाचा वधाचा प्रसंग साकारुन उपस्थितांची मने जिंकली.
चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य मनी चावला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन पुजा अहिरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments