Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतमजूर उत्तम परशराम आहेर यांचा मुलगा नवनाथ उत्तम आहेर हा नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला व त्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट -क मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मांडवड येथील नवनाथ हा शेतकरी कुटुंबातील असून वडिलांची परिस्थिती अगदी बिकट त्यात त्याला सहा बहिणी त्यांचे विवाह व शिक्षण आई-वडिलांनी काबाड कष्ट करून लोकांच्या शेतात मजुरी करून केले परिस्थिती प्रतिकूल असल्याने समाजात अगदी कमी दर्जा मिळत होता. त्यातून आई-वडिलांचे कष्ट बघून अक्षरश: अश्रू अनावर होत होते म्हणून निश्चय केला. आता आई-वडिलांचे नाव गर्वाने मोठे करायचे घरची गरीबी दूर करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असा निश्चय करून आणि २०२१ ला नाशिक गाठले व अभ्यासाला सुरुवात केली तीन वर्ष जोरदार अभ्यास केला परंतु तेथील फी व खर्च झेपत नव्हता म्हणून आठवड्यातील शनिवार व रविवार या दोन दिवशी गावात मांडवड येथे शेतमजुरीसाठी जाऊन कांदा लागवड, कापूस वेचणी मिळेल ते शेतमजुरी करून मिळालेल्या पैशात नाशिक येथील अभ्यासिकेचा खर्च भागवत होता.
या दरम्यान अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु नवनाथच्या हातात यशाची दोरी काही लागली नाही अखेर नवनाथच्या बहिण व दाजींनी त्याला सहारा धीर दिला आणि नऊ ते बारा तास अभ्यास करून त्याने सरळ सेवा परीक्षेत कोतवाल पदाचा अर्ज दाखल केला. त्या परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवून त्याची २०२३ ला मांडवड तलाठी कार्यालयात कोतवाल पदी निवड झाली. परंतु कोतवाल पदावर मन लागत नसल्याने आपले शिक्षण एम.बी.ए झाले असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून मोठे काहीतरी व्हायचं हे स्वप्न पहिलेच ठरलेलं होतं पुन्हा प्रयत्न सुरू करण्यासाठी दाजी व बहीण यांनी प्रोत्साहन दिले.
पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा फॉर्म भरला दिवसभर कोतवालाची नोकरी सांभाळून रात्री अभ्यास करत, आईला लोकांच्या कामाला जाताना बघून रात्रीचा दिवस करणे हे त्याच्यापुढे आता मोठे आव्हान झाले नातेवाईकांच्या वाईट बोलल्यामुळे जिद्द पुन्हा लागली होती.आता थांबायचे नाही अशी जिद्द मनात ठेवली आणि मेहनत करायला सुरुवात झाली. परीक्षेचा अभ्यास हेच लक्ष डोळ्यासमोर होते. अनेक वेळा अपयश आले परंतु असे वाटले की "अपयश हीच यशाची पहिली पाहिरी आहे" आणि ११ फेब्रुवारी २०२५ Mpsc च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला हा दिवस म्हणजेच नवनाथच्या जिद्द, मेहनत व कष्टाची स्वप्नपूर्तीचा ठरली.
नवनाथ मंत्रालय महसूल सहाय्यक झाल्याचे गावात समजताच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. आई रंभाबाई यांना तर कळतच नव्हतं की आपला मुलगा कोणता अधिकारी बनला जेव्हा गावातील लोकांनी व नातेवाईकांनी सांगितल्यावर त्यांचे अक्षरशः आनंद अश्रू थांबत नव्हते. नवनाथ चे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण स्व. शरद अण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड शाळेत झाले तसेच उच्च शिक्षण व पदवीचे शिक्षण झाले. आज मंत्रालय महसूल सहाय्यक पदी नवनाथची निवड झाली याचा मला सार्थ अभिमान आहे असे उद्गार वडील उत्तम आहेर यांनी काढले. यावेळी बोलताना नवनाथ चे वडील म्हणाले की, आई वडिलांचे कष्ट जिद्द आणि चिकाटी ठेवून गाव खेड्यातील प्रत्येक तरुणांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी यश नक्कीच मिळते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
0 Comments