कासलीवाल प्राथमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न

 Bay -team aavaj marathi 

जेष्ठ पत्रकार विजय जी चोपडा नांदगाव (नाशिक)

श्री. एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट संचलित सौ.क.मा. कासलीवाल प्राथमिक विद्यालयात 6 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे सचिव. मा. श्री विजय चोपडा, विश्वस्त जुगल किशोर अग्रवाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल सावंत इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपॉल मनी चावला यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यां- -कडून उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मिळाला शालेय क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, डॉजबॉल सॅकरेस बेडूक उड्या100 मीटर धावणे इत्यादी खेळांचे आयोजन केले होते.

या क्रीडा सामन्यांचे पंच म्हणून विद्यालयातील शिक्षक तुषार जेजूरकर, सिद्धार्थ जगताप, यांनी काम पाहिले .तर गुणलेखक म्हणून श्री. अभिजीत थोरात, श्रीमती निलोकर पठाण यांनी काम पाहिले.स्पर्धा समाप्तीनंतर विजेत्या सर्व विद्यार्थी खेळाडूंना प्रमाणपत्रे मेडल व ट्रॉफी वितरीत करण्यात आली.याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक विशाल सावंत यांनी शिक्षणाबरोबरच खेळाकडे ही लक्ष दिले पाहिजे.खेळातून आरोग्य,पैसा,व नोकरी देखील मिळू शकते म्हणून खेळाकडे करिअर च्या दृष्टिकोनातून ही पाहिले पाहिजे असे प्रतिपादन केले.

संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमार जी कासलीवाल तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,  प्रकाश गुप्ता,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल यांनी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघांचे तसेच सर्व खेळाडूंचे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 

वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात, तुषार जेजुरकर, श्रीमती. धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण, वैशाली शिंदे,जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत, पुनम खोंडे,अर्चना बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments