शेतजमीन मोजणी नकाशाच्या बदल्यात लाच घेताना भुमी अभिलेख विभागाचा एकजण रंगेहाथ

 Bay- team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार चांदवड (नाशिक)

शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारात तक्रारदार यांची मालकीची येथे गट नंबर १७ ही शेतजमीन आहे. या शेतजमिनीची आरोपी लोकसेवक अभिजित अर्जुन वळवी वय ४३ वर्षे, व्यवसाय उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, शहादा यांचे कार्यालयात भु.करमापक (सरकारी नोकरी) करत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांची यापूर्वी वरील गट नंबर असलेली शेतजमीन आरोपी मोजणी केली आहे परंतु शेत मोजणीचे शीट (मोजणी नकाशा) तक्रारदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे नकाशाची प्रत आरोपी लोकसेवक यांना वारंवार मागीतले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेत मोजणीचे मोजणी शिट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची व तडजोडी अंती पंचांसमक्ष पाच हजार रूपयांची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे माहिती दिली असता आलोसे यांस सापळा रचून ०६ फेब्रुवारी रोजी ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्राच्या मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शना- खाली नंदुरबार ला.प्र.वि. पोलीस अधीक्षक, नेहा तुषार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपाधीक्षक राकेश चौधरी,पो.नि नरेंद्र खैरनार स.पो.नी विलास पाटील

 पो. हवा. हेमंत महाले, विजय ठाकरे, देवराम गावित, संदीप खंडारे, जितेंद्र महाले, नरेंद्र पाटील, पोना सुभाष पावरा यांनी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारताना रंगेहाथ पकडले असून, शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

.



Post a Comment

0 Comments