शिवजयंती उत्सव समितीच्या उत्सव समिती अध्यक्षपदी सुनील जाधव यांची एकमताने निवड

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव नाशिक 

नांदगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे गुरुवार दि.६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कार्यकारणी निवडीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांची एकमताने अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

यावेळी नगराध्यक्ष राजेश (बाबी काका) कवडे, डॉ. सुनील तुसे, समाधान पाटील, चेतन पाटील, नंदू पाटील, अमोल नावंदर, प्रमोद भाबड, प्रकाश शिंदे, बापू जाधव, भैय्यासाहेब पगार, उमेश उगले, नाना जाधव, तानसेन जगताप, नंदू रजोळे, रवी सानप, सिद्धेश खरोटे, तात्या पवार, अतुल निकम, पिंटू सोळसे, सुनील सोर, शरद आयनोर, चेतन शिंदे, गणेश सांगळे, मुज्जू शेख, मुश्ताक शेख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांना नांदगाव शहरात आ.सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी साकार झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी तमाम शिवप्रेमींनी सहभाग घेण्याचे आवाहन सुनील जाधव यांनी केले. 
     

Post a Comment

0 Comments