नांदगांव बाजार समितीचे सभापती पदी दर्शन आहेर यांची बिनविरोध निवड

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगांव बाजार समितीचे सभापती पदी दर्शन अनिलकुमार आहेर यांची दि.७ रोजी बिनविरोध झाली.मावळते सभापती सतिष विनायक बोरसे यांनी रोटेशन नुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात सभापती पदाच्या निवडीसाठी नांदगांव चे सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी दर्शन अनिलकुमार आहेर यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी जाहिर केले.आहेर यांच्या नामनिर्देशन पत्रावर संचालक सतिष बोरसे यांनी सुचक तर उपसभापती दिपक मोरे यांनी अनुमोदक म्हणून सही केली होती. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आ. सुहास(आण्णा) कांदे व जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे , माजी आमदार अँड. अनिल दादा आहेर यांचे प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाची शिवनेरी सभागृह येथे बैठक झाली असता दर्शन आहेर यांचे नावावर एकमत झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली.

 निवडणूकी वेळी माजी आ. संजय पवार, माजी सभापती तेज दादा कवडे, विलास भाऊ आहेर , माजी नगराध्यक्ष राजेश (बाबी काका) कवडे, माजी जि.प.सदस्य रमू काका बोरसे, दिलीप आप्पा इनामदार, ज्ञानदेव आहेर, अरूण पाटील, मजूर फेडरेशन संचालक प्रमोद भाबड,युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे, डॉ.शरद आहेर, शिवसेना नेते किरण कांदे, बाळासाहेब कवडे, उदय पवार, कैलास गायकवाड, हरेश्वर सुर्वे, जिभाऊ पवार, बाजार समितीचे संचालक एकनाथ सदगीर, साहेबराव पगार, अर्जुन पाटील, पोपट सानप, अनिल वाघ, अनिल सोनवणे, अलका ताई कवडे , मंगला काकळीज, अमोल नावंदर, यज्ञेश कलंत्री, निलेश इपर, सचिव अमोल खैरनार यांच्यासह, आण्णासाहेब पगार, रमेश पगार, शिवाजी बच्छाव, संदिप मवाळ, शरद सोनवणे,अनिल सरोदे यांचेसह तालुक्यातील ग्रामस्थ ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शन आहेर यांचे निवडीचे आमदार सुहास आण्णा कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी सभापती तेज कवडे इत्यादींनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments