भाऊजयी च्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न नांदगाव तालुक्यातील घटना

 Bay -team aavaj marathi 

जेष्ठ पत्रकार मारुती जगधने नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील टाकळी खुर्द येथील संशयित आरोपी दिनकर यशवंत फोडसे याने सख्ख्या भावाची पत्नी सारिका सागर फोडसे (वय २५) राहणार टाकळी खुर्द यांच्याशी दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद घालून मारहाण करून ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनकर याने आपली सख्खी  भावजय सारिका सागर गोडसे वय २५ राहणार टाकळी यांच्या अंगावर किरकोळ कारणावरून वाद घालत ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता सारिका या जखमी झाल्या असल्याबाबत नांदगाव पोलिस ठाण्यात या घटनेतील जखमी सारिका यांचे पती सागर यशवंत फोडसे यांच्या फिर्यादीवरून c c t n s- ५६/२०२५ नुसार बि.एन.एस कलम १०९,११५(२), ३५१, (२)(३),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील संशयीत दिनकर फोडसे यांस आणि गुन्ह्यातील ट्रॅक्टर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक सुनील बडे आणि पो. हवा.धर्मराज अलगट यांनी ताब्यात घेऊन नांदगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. वरील संशयितांची पोलिस कोठडी संपल्याने त्याची मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी करण्यात आलेली असून अधिक तपास पो. निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो.निरीक्षक सुनील बडे आणि पो. हवा.धर्मराज अलगट हे करत आहेत.



Post a Comment

0 Comments