Bay- team aavaj marathi
जेष्ठ पत्रकार मारुती जगधने नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी खान्देश रत्न, वैराग्य मूर्ती ह.भ.प. तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि ८ रोजी आशीर्वाद समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तुकाराम महाराज यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देताना खूप शिका आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच ज्ञानार्जन करा, आपल्या माता-पित्याला, गुरुजनांना आणि आपल्या शाळेला कधीही विसरू नका असा उपदेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विजय चोपडा हे होते. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतांना अध्यक्ष फार भावुक झाले त्यातून त्यांच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती असलेली जवळीक दिसून आली.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक धनंजय सोनवणे यांनी आयुष्यात सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि शाळेने तुम्हाला परीक्षेसाठी तयार केले आहे; चांगले संस्कार दिलेले आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक सुनील हिंगमीरे यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनातही शिस्तीचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थी या प्रसंगी फार भावुक झालेले होते तेंव्हा 'निरोपाचा क्षण नाही आशीर्वादाचा सण आहे' प्रत्यक्ष तुकाराम बाबांचे आशीर्वाद तुम्हाला आज लाभत आहेत हे आपल्या शाळेचे थोर भाग्य आहे असे प्रतिपादन केले. दहावीचे वर्गशिक्षक योगेश कुलकर्णी व माजी शिक्षक पोपट चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींचे स्वागत विद्यालयाच्या गीतमंच च्या विद्यार्थिनींनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीमती ज्योत्स्ना चव्हाण यांनी करून दिला. वैराग्यमूर्ती तुकाराम बाबांचे स्वागत व सत्कार अध्यक्ष विजय चोपडा यांच्या हस्ते करणयात आला. अध्यक्ष आणि इतर मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापक सुनील हिंगमीरे यांनी केला.
कला शिक्षक दिलीप भडांगे यांनी सुंदर फलक लेखन केले आणि 'अशी पाखरे येती' या प्रसंगपूरक गीताचे कडवे सादर केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी आणि मान्यवरांना मिसळ-पाव देण्यात आला.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांनी केक कापून, शिक्षकांसोबत फोटो काढून विद्यालयातील आपला शेवटचा दिवस आनंदात साजरा केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी गोराडे तर आभार ऋषी कुमार डोमाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाने रत्नप्रभा पाटील, प्रशांत वाघ, नंदू दवांगे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments